इस्लाम स्वीकारण्यासाठी बॉयफ्रेंडची बळजबरी! अभिनेत्रीचे गंभीर आरोप, मोठी अपडेट समोर
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडवर अनेक गंभीर आरोप केले. आता देखील असंच काही झालं आहे. अभिनेत्रीने बॉयफ्रेंडवर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजबरी करण्याचे आरोप केले. यावर आता त्याच्या भावाने मोठं वक्तव्य केलं आहे.

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील असंच काही झालं आहे. काही महिन्यांपूर्वी हिमांशी खुराना हिने एक्स बॉयफ्रेंड आसिम रियाझ याच्यावर गंभीर आरोप केलेले. पारस छाबडा याच्या पॉडकास्टमध्ये हिमांशी हिने आसिम याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपचं कारण स्पष्ट केलं होतं. कुटुंबियांच्या सांगण्यानुसार आसिम याने माझ्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजबरी केलेली…. हिमांशी हिच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी दोन गटात विभागले गेले. अनेकांनी हिमांशी याला ट्रोल केलं, काहींनी आसिम याचा विरोध केला. आता यावर आसिम याचा भाऊ उमर रियाझ याने मौन सोडलं आहे. तर जाणून घ्या उमर रियाझ काय म्हणाला.
उमरने साधला हिमांशीवर निशाणा…
रिपोर्टनुसार, उमरने सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण अधिक दुःखद होतं, कारण लोकांनी आसिमची बाजू ऐकून न घेताच त्याच्यावर आरोप लावले आणि त्याला कमी लेखण्यास सुरुवात केली. उमर म्हणाला की, आसिम सहसा आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वादाला उत्तर देत नाही, पण अनेकदा गप्प राहणं महागात पडतं.
उमरने सांगितलं की, गप्प राहिल्यामुळे अनेकदा लोकांना असं वाटतं की, त्यांच्याबद्दल जे काही बोललं जात आहे, ते सर्व खरं आहे. या वेळी जे घडले, ते अत्यंत दुःखद होतं. यावरून असं वाटतं की कदाचित आपले नातं सार्वजनिक करायला नको होतं. असं देखील उमर म्हणाला.
4 वर्षांचं होतं रिलेशनशिप…
आसिम आणि हिमांशी यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 13’ मध्ये त्यांची पहिली भेट झाली. हिमांशी त्या सीजनमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये आली होतीय. एवढंच नाही तर, त्या वेळी तिचा तत्कालीन बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा देखील झाला होता. शो दरम्यान आसिमचे हिमांशीवर प्रेम जडलं आणि त्यांची केमिस्ट्री त्या सीजनमधील सर्वात चर्चित रिलेशनशिप्सपैकी एक बनली. ‘बिग बॉस 13’ नंतरही दोघे एकमेकांना डेट करत राहिले आणि जवळपास चार वर्षे एकत्र राहिले.
पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि ब्रेकअपची घोषणा केली. त्यानंतर हिमांशी हिने आसिम याच्यावर गंभीर आरोप केले. हिमांशी केलेल्या आरोपांमुळे आसिम वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला.
