AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Charak: नरभक्षण, मानवी बळी यांचं खतरनाक चित्रण; सेन्सॉरने अडवताच दिग्दर्शक संतापले

सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'चरक' या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास सेन्सॉर बोर्डाने नाकारलं आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये नरभक्षण, मानवी बळी यांसारखी भयानक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. नेमका हा वाद काय आहे, ते जाणून घ्या..

Charak: नरभक्षण, मानवी बळी यांचं खतरनाक चित्रण; सेन्सॉरने अडवताच दिग्दर्शक संतापले
Charak TeaserImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 23, 2026 | 12:06 PM
Share

‘द केरळ स्टोरी’, ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन हे त्यांच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. ‘चरक’ असं त्यांच्या या नव्या चित्रपटाचं नाव असून काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘टीझर’ प्रदर्शित झाला होता. या टीझरने त्यातील वादग्रस्त दृश्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता सेन्सॉर बोर्डाने थेट या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर सुदिप्तो सेन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी का दिली नाही, हे मला अद्याप समजलं नाही, अशी प्रतिक्रिया सेन यांनी दिली. त्याचसोबत जर सेन्सॉर बोर्डाला आक्षेप असेल तर त्यांनी चित्रपटातील काही वादग्रस्त सीन्स हटवण्याचीही तयारी दर्शवली आहे. बोर्डाने ‘चरक’च्या प्रदर्शनाला अद्याप हिरवा कंदिल दाखवलेला नाही. तसंच त्यांच्याकडून कोणतंही स्पष्ट कारणसुद्धा देण्यात आलं नसल्याचं सेन म्हणाले.

‘चरक: फेअर ऑफ फेथ’ या त्यांच्या चित्रपटाच्या टीझरमध्ये बरीच वादग्रस्त दृश्ये पहायला मिळाली होती. प्रदर्शनाच्या काही दिवस आधी सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र नाकारत हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीसमोर पाठवला आहे. दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये काही विशिष्ट हिंदू पंथांमधील गुप्त प्रथांचं चित्रण करण्यात आलं आहे. यांमध्ये कथित मानवी बळी, नरभक्षण दाखवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ‘चरक’च्या 52 सेकंदांच्या टीझरमध्ये तांत्रिक प्रथा, अंधश्रद्धा, अंधभक्ती यांचं भयावह चित्रण दाखवण्यात आलं आहे. एका दृश्यात तर चक्क तांत्रिकाला मृतदेह फाडून खाताना दाखवलं आहे. हे सर्व सीन्स अंगावर काटा आणणारे आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pen Movies (@penmovies)

‘न्यूज 18’शी बोलताना सुदिप्तो सेन म्हणाले, “मला खरंच समजत नाहीये की या चित्रपटाला का रोखण्यात आलं? या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. जर त्यातून एखादा सीन हटवायचा असेल, तर त्याचाही मला स्वीकार आहे. परंतु त्यासाठी संपूर्ण चित्रपटाला नकार देऊ नये. आम्ही कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक वादाला तोंड देण्यासाठी हा चित्रपट बनवला नाही. तर समाजात प्रचलित बेकायदेशीर आणि अंधश्रद्धाळू प्रथांना उघड करण्यासाठी तो बनवला आहे. श्रद्धेच्या नावाखाली जर काही चुकीचं घडत असेल, तर त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो का?”

‘चरक’ या चित्रपटात अंजली पाटील, साहिदूर रहमान, सुब्रत दत्ता, शशी भूषण, नलनीश नील, शंखदीप आणि श्यौनक श्यामल यांच्या भूमिका आहेत. 6 मार्च 2026 ही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आहे. परंतु सेन्सॉर बोर्डाकडून मान्यता आणि प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय तो थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...