AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे अजिबात खपवून घेणार नाही.. अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय थेट म्हणाले, मी..

CM Vijay On Trisha : मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय उर्फ थलपती विजय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यातच त्यांनी विरोधकांना महिलांवरील आक्षेपार्ह भाषेच्या मुद्द्यात दिला. विरोधकांकडून त्रिशा कृष्णन यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली.

हे अजिबात खपवून घेणार नाही.. अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय थेट म्हणाले, मी..
CM Vijay On Trish
| Updated on: Sep 07, 2026 | 5:16 PM
Share

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय उर्फ थलपती विजय त्यांच्या राजकीय जीवनासोबतच खासगी आयुष्यामुळेही तूफान चर्चेत आहेत. थलपती विजय यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने त्यांच्याविरोधात केलेला घटस्फोटाचा खटला मागे घेतला. त्यानंतर थलपती विजय यांची अत्यंत जवळची मैत्री अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ज्याने विविध चर्चांना उधाण आले. त्यातच तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी नुकताच विधानसभेत महिलांवरील आक्षेपार्ह आणि अश्लील टिपण्यावरून कठोर भूमिका घेतली आहे. अत्यंत जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याविरोधात राजकीय नेत्यांकडून मोठी टिप्पणी करण्यात आली. थलपती विजय यांनी म्हटले की, माझ्या राजकीय विजयात महिलांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मी महिलांविरोधात कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह भाषा अजिबात खपवून घेणार नाही.

राजकारणात राजकीय टीका नक्कीच असू शकते. पण कोणत्याही महिलेचा सन्मान राखलाच पाहिजे, अशी भूमिका मांडताना त्यांनी मोठा इशारा दिला. कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका करताना डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल धक्कादायक विधान केले. ज्यानंतर मोठी आंदोलने झाली.

हेच नाही तर त्रिशा कृष्णन यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणात प्रवीण गणेश या एका उद्योजकावर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. एक्सवर पोस्ट शेअर करणे त्याला चांगलेच महागात पडले. त्रिशा कृष्णन ही मुख्यमंत्री विजय यांची अत्यंत जवळची मैत्रीण आहे.

ती अनेकदा विजय यांच्यासोबत दिसली आहे. त्यातच आता विधानसभेत बोलताना महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी यादरम्यान स्पष्ट केले. त्यांनी एकप्रकारे विरोधकांना मोठा इशाराच दिला. त्रिशा कृष्णन विरोधात सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या जातात, ज्यात आक्षेपार्ह भाषा वापरली जाते. अशाप्रकारच्या पोस्ट शेअर करणाऱ्याविरोधात कारवाई मोठ्या प्रमाणात केली जातंय.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा