Chinmayee Sumeet : फक्त रिक्षावाल्यांना धाक दाखवायचा! मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीतचं परखड मत; थेट अंबानींचं नाव घेत म्हणाली…

Chinamyee Sumeet On Marathi Language : मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं नुकत्याच एका मुलाखतीत मराठी भाषा सक्तीवर तिचं मत व्यक्त केलं आहे.

Chinmayee Sumeet : फक्त रिक्षावाल्यांना धाक दाखवायचा! मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीतचं परखड मत; थेट अंबानींचं नाव घेत म्हणाली...
| Updated on: Nov 24, 2026 | 1:30 PM

महाराष्ट्रात रिक्षा चालवणाऱ्या चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रिक्षाचालकांना मराठी भाषा समजणं आणि बोलता येणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे. मात्र, सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचं ठरवलं होतं. चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रशिक्षण आणि मुदत देण्यात आली. ऑगस्ट २०२६ मध्ये राज्य सरकारनं रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या अ‍ॅपआधारित प्रवासी वाहनांच्या चालकांसाठीही मराठीचे ज्ञान आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं. यावर आता मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं तिचं मत व्यक्त केलं आहे.

मराठी भाषा सक्तीवर चिन्मयीचं मत

Loading...

मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्री अनेकदा सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर भाष्य करते. रिक्षा–टॅक्सी चालकांच्या मराठी भाषा शक्तीवर बोलताना चिन्मयी म्हणाली की, ‘उद्या जर महाराष्ट्रातील व्यक्ती तेलंगनामध्ये, तमिळनाडूत गेला तेव्हा जर तो म्हणाला की, ‘आम्ही ही भाषा शिकणार नाही आम्हाला मराठीचा अभिमान आहे’ तर ते बरोबर नाही. पण फक्त रिक्षावाल्यांना पकडायचं आणि त्यांना धाक दाखवायचा. पण बाकीच्या लोकांना सोडून द्यायचं कारण ते उच्च पदस्थ आहेत. म्हणजे, अंबानीची मुलं मराठी बोलतात की, नाही याबद्दल तुम्हाला काहीच वाटणार नाही.’

‘अमिताभ बच्चन 4 वाक्य मराठी बोलणार नाही, याबद्दल तुम्हाला काहीच वाटणार नाही. जर ते बोललेच एखाद वाक्य तर तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता. अरे, तुम्ही बोलायलाच पाहिजे, तुमची हयात गेली आहे इकडे आणि तुम्ही भाषा प्रेमी आहात. तुम्ही लिंग्विस्टिक आहात. तुम्ही भाषा प्रेमी आहात. यायलाच पाहिजे! भाषा हे संवादचं माध्यम आहे विसंवादाचं नव्हे. त्याची जबरदस्ती का करावी?’ असंही चिन्मयी शेवटी म्हणाली. ‘युसीएन न्यूज लाईव्ह‘ला दिलेल्या मुलाखतीत चिन्मयी बोलत होती.

 

दरम्यान, चिन्मयी सुमीतच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘दे धमाल’, ‘मुरांबा’, ‘पोर बाजार’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘चेकमेट’, ‘बन मस्का’ यांसारख्या सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us