AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan : ‘किंग’साठी प्रेक्षक का आहेत इतके उत्सुक? शाहरुख-दीपिकाच्या जोडीसह ही 5 कारणं ठरतायत गेमचेंजर

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान स्टारर 'किंग' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खानच्या किंग सिनेमाची चर्चा सुरु असून सिनेमासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, त्यासाठी फक्त शाहरुख आणि दीपिका यांच्या जोडीसह ही 5 कारणं गेमचेंजर ठरत आहेत.

Shah Rukh Khan : 'किंग'साठी प्रेक्षक का आहेत इतके उत्सुक? शाहरुख-दीपिकाच्या जोडीसह ही 5 कारणं ठरतायत गेमचेंजर
दीपिका पादुकोण - शाहरुख खान
| Updated on: Nov 24, 2026 | 1:24 PM
Share

Shah Rukh Khan : ‘झिरो’ सिनेमा सुपरफ्लॉप ठरल्यानंतर अभिनेता शाहरुख खान तब्बल चार वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिला. त्यानंतर अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून दमदार एन्ट्री केली आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली. त्यानंतर किंग खान याने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि आता ‘किंग’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘किंग’ सिनेमात पु्न्हा शाहरुख आणि दीपिका यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दोघांच्या जोडीने ‘ओम शांति ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅप्पी न्यू ईयर’, ‘जवान’ आणि ‘पठाण’ दमदार कामगिरी केली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या चाहत्यांच्या मनातील सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शाहरुख आणि दीपिका यांच्या जोडीसह ही 5 कारणं गेमचेंजर ठरत आहेत.

सर्वात पहिला कारण म्हणजे, शाहरुख खान याचं मोठ्या पडद्यावर पदार्पण…. शाहरुख खानने 2023 मध्ये एकामागून एक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. यामध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ यांचा समावेश आहे. आता तीन वर्षांनंतर, 2026 च्या डिसेंबर महिन्यात त्याचा ‘किंग’ हा सिनेमा प्रदर्शित होणार असून त्याच्या या कमबॅकबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

दुसरं कारण म्हणजे, शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद यांनी यापूर्वी एकत्र काम केलं तेव्हा ‘पठाण’ हा सिनेमा बनवला होता, ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. सिद्धार्थ आनंद हे असे ॲक्शन सिनेमे बनवण्यासाठी ओळखले जातात, जे केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच करत नाहीत, तर शानदार व्हिज्युअल्स, कथा आणि जबरदस्त ॲक्शनच्या जोरावर शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.

हिंदी चित्रपटसृष्टीत असे फार कमी सिनेमे पाहायला मिळतात, ज्यात इतकी तगडी स्टारकास्ट एकत्र दिसते. या सिनेमात शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान यांच्यासोबत दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, राणी मुखर्जी, जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत, अर्शद वारसी, राघव जुयाल आणि अभय वर्मा यांसारखे कलाकार एकत्र दिसणार आहेत.

‘किंग’ सिनेमाचं चित्रीकरण आंतरराष्ट्रीय लोकेशन्सवर झालं असून यात थरारक ॲक्शन सीक्वेन्स पाहायला मिळतील. याशिवाय सिनेमाची प्रॉडक्शन व्हॅल्यू देखील अत्यंत भव्य ठेवण्यात आली आहे. हा चित्रपट IMAX आणि 4DX फॉरमॅटमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.

शाहरुख खानच्या या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी अगदी योग्य वेळेची निवड करण्यात आली आहे. ‘किंग’ ख्रिसमसच्या एक दिवस आधी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे ‘किंग’ सिनेमा बॉक्स किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल