मुंबईतील चित्रा सिनेमा थिएटर कायमचं बंद

मुंबई : मुंबईतील चित्रा सिनेमा हा चित्रपटगृह अखेर कायमचं बंद झालंय. गुरुवारी रात्री 9.30 वाजता अखेरचा शो या सिनेमागृहात दाखवण्यात आला. गेल्या 36 वर्षांपासून अनेक सुपरहिट सिनेमे या सिनेमागृहात दाखविण्यात आले. पण प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद आणि आर्थिक चणचण या कारणांमुळे सिनेमागृह बंद करावं लागत असल्याचं व्यवस्थापनाने सांगितलंय. काही दिवसांपूर्वीच अभिनेता टायगर श्रॉफचा प्रदर्शित झालेला ‘स्टुडंट ऑफ …

Chitra Cinema mumbai, मुंबईतील चित्रा सिनेमा थिएटर कायमचं बंद

मुंबई : मुंबईतील चित्रा सिनेमा हा चित्रपटगृह अखेर कायमचं बंद झालंय. गुरुवारी रात्री 9.30 वाजता अखेरचा शो या सिनेमागृहात दाखवण्यात आला. गेल्या 36 वर्षांपासून अनेक सुपरहिट सिनेमे या सिनेमागृहात दाखविण्यात आले. पण प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद आणि आर्थिक चणचण या कारणांमुळे सिनेमागृह बंद करावं लागत असल्याचं व्यवस्थापनाने सांगितलंय.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता टायगर श्रॉफचा प्रदर्शित झालेला ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटाचा शेवटचा शो या सिनेमागृहात दाखवण्यात आला. या सिनेमागृहात एकूण 550 आसने आहेत. या सिनेमागृहाची धुरा पी.डी मेहता यांचे चिरंजीव दारा मेहता यांनी सांभाळली होती. मात्र प्रेक्षकांचा अल्पप्रतिसादामुळे व्यवसाय तोट्यात गेल्याने सिनेमागृह बंद करण्याची वेळ आली आहे.

दारा मेहता यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितलं की, आम्ही 10 ते 15 टक्के व्यवसाय करत होतो. पण देखभालीवरच जास्त खर्च होत होता. किमान अखेरच्या शोसाठी लोक येतील असं वाटलं होतं, पण तेही घडलं नाही. हा व्यवसाय करणारी आमच्यातली माझी तिसरी पिढी आहे. माझे कर्मचारीही इथे मनाने गुंतलेले होते, मला झोपही लागत नव्हती, पण मी कुणाला सांगावं, अशी हतबल प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“1961 साली प्रदर्शित झालेला शम्मी कपूर यांचा ‘जंगली’ हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमाने चित्रा सिनेमाचे तब्बल 25 आठवडे गाजविले होते. त्या काळात मराठी प्रेक्षकांचा ओघ जास्त होता. पण कालांतराने मल्टीप्लेक्सचा जमाना आला आणि स्पर्धाही वाढली. याच कारणामुळे चित्रा सिनेमावर कायमचा पडदा ओढण्याची वेळ आली आहे.

1983 मध्ये प्रदर्शित झालेला जॅकी श्रॉफचा ‘हिरो’ हा सिनेमाही प्रचंड गाजला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रा सिनेमागृहाजवळ प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी या सिनेमागृहात या सिनेमाचे हाऊसफुल शो सुरु होते. विशेष म्हणजे जॅकी श्रॉफचा सिनेमा ज्या सिनेमागृहात सुपरहिट ठरला, त्याच जॅकी श्रॉफच्या मुलाचा म्हणजेच टायगर श्रॉफच्या सिनेमाचा शेवटचा शो इथे झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *