AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती मंधानाशी लग्न मोडलं; सलमानची हिरोइन पलाश मुच्छलला म्हणाली ‘चांगला माणूस’

अभिनेता सलमान खानची हिरोइन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पलाश मुच्छलबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. स्मृती मंधानाशी लग्न मोडल्यानंतर पलाशवर बरीच टीका झाली होती. या टीकांदरम्यान अभिनेत्रीने पलाशला चांगला माणूस असं म्हटलं आहे.

स्मृती मंधानाशी लग्न मोडलं; सलमानची हिरोइन पलाश मुच्छलला म्हणाली 'चांगला माणूस'
पलाश मुच्छल- स्मृती मंधानाImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 26, 2026 | 10:02 AM
Share

क्रिकेटर स्मृती मंधानाशी लग्न मोडल्यापासून संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पलाशवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आणि त्यानंतर सोशल मीडियावरही त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं. अशातच सलमान खानसोबत काम केलेली अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर-कोरिओग्राफर डेजी शाहने पलाशचं कौतुक केलं आहे. ‘फिल्मीज्ञान’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत डेजीने पलाशसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छलमुळे डेजीची पलाशशी भेट झाली होती. पलकने डेजीच्या पदार्पणातील ‘जय हो’ या चित्रपटातील गाणं गायलं होतं. तिथूनच त्यांची मैत्री सुरू झाली होती.

या भेटीविषयी डेजी म्हणाली, “पलाश हा व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे. मी त्याला दोन-चार वेळा भेटले आहे. पलकने माझ्या ‘जय हो’ या चित्रपटासाठी गाणं गायलं होतं, त्यामुळे तेव्हापासून मी तिला ओळखते. पलकच्या घरी पार्ट्यांना आणि गणपती पूजाला माझं जाणं-येणं असतंच. तिथेच माझी भेट पलाश मुच्छलशी झाली. तो संगीतकार आणि दिग्दर्शक आहे हे तेव्हाच मला समजलं होतं.”

“मी पलाशच्या कुटुंबीयांना भेटले आहे आणि ते खूप सुंदर कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण अत्यंत नम्र स्वभावाचे आहेत. त्यांचा देवावर खूप विश्वास आहे आणि माझ्या मते त्यांबद्दलची ही खूप चांगली गोष्ट आहे. देवावर विश्वास ठेवणारे लोक अत्यंत सकारात्मक असतात”, अशा शब्दांत डेजी व्यक्त झाली. आश्चर्याची बाब म्हणजे स्मृती मंधानाशी लग्न मोडल्यानंतर पलाशवर अनेक आरोप झाले. लग्नाच्या एक दिवस आधी त्याला कोरिओग्राफरसोबत रंगेहाथ पकडल्याचीही जोरदार चर्चा होती. 23 नोव्हेंबर 2025 रोजी पलाश आणि स्मृती लग्नबंधनात अडकणार होते. सांगलीत मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला होता. परंतु लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर हळूहळू पलाशबद्दलच्या चर्चा समोर येऊ लागल्या होत्या. काही दिवसांनी पलाश आणि स्मृती यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित लग्न होणार नसल्याची माहिती चाहत्यांनी दिली होती.

लग्न मोडल्यानंतर पलाश आणि स्मृती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. स्मृतीने क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रीत केलं, तर दुसरीकडे पलाशने अभिनेता श्रेयस तळपदेसोबत प्रोजेक्टची घोषणा केली. पलाशच्या आगामी चित्रपटात श्रेयस भूमिका साकारणार आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा