AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neha Bora : ‘पोलिसांनी नोहा बोराला खासगी कारमधून नेलं अन्…’, विशाल ददलानीची खळबळजनक पोस्ट

Vishal Dadlani Neha Bora Instagram Post: 'पोलिसांनी नोहा बोराला खासगी कारमधून नेलं अन्...', दिल्ली पोलिसांनी आंदोलनादरम्यान नेहा बोरा यांना ताब्यात घेतलं आहे. ज्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर आता गायक विशाल ददलानी यांनी खळबळजनक पोस्ट केली आहे.

Neha Bora : 'पोलिसांनी नोहा बोराला खासगी कारमधून नेलं अन्...', विशाल ददलानीची खळबळजनक पोस्ट
Neha Bora
| Updated on: Oct 17, 2026 | 1:45 PM
Share

Vishal Dadlani Neha Bora Instagram Post: कॉक्रोच जनता पार्टी सतत सरकारवर निशाणा साधताना दिसत असताना दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आहे प्रसिद्ध गायक विशाल ददलानी (Vishal Dadlani) यांनी केलेल्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. विशाल यांच्या दाव्यानुसार, आंदोलक नेहा बोरा (Neha Bora) यांना पोलिसांनी एका खासगी कारमधून अज्ञात स्थळी नेलं असून नेहा अद्यापही गायब आबे. या घटनेनंतर सोशल मीडियावर आता #WhereIsNeha ट्रेंड करु लागलं आहे. विशाल यांनी पोलिसांना विचारलं की, ‘नेहा बोरा अखेर आहे तरी कुठे?’

विशाल ददलानीचं गंभीर आरोप आणि प्रश्न

सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत विशाल म्हणतो. नेहा बोरा यांना एका खासगी गाडीतून अज्ञात ठिकाणी नेलं आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. देशाच्या राजधानीत कायद्याचा दर्जा कुठे पोहोचला आहे? एवढंच नाही तर, पोस्टमध्ये विशाल यांनी अनेक आंतरराष्ट्रीय माध्यम प्लॅटफॉर्म्सनाही टॅग केलं आहे, ज्याद्वारे जगाचं लक्ष या गोष्टीकडे वेधेल की, पुरोगामी तरुणांचा आवाज बनलेल्या एक तरुणीला कशा प्रकारे गायब केलं जातं. या घटनांनंतर, सोशल मीडियावर ‘#WhereIsNeha’ हा हॅशटॅग वेगाने ट्रेंड होत आहे.

विशाल ददलानी यांच्या म्हणण्यानुसार, अभिजित दिपके आणि नेहा बोरा यांच्या अटकेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने लोक कनॉट प्लेसमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी असा इशारा दिला आहे की, शांततापूर्ण आदोलकांना अशा प्रकारे ताब्यात घेणं सरकारवरच उलटू शकतं आणि यामुळे या आंदोलनाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मोठा पाठिंबा मिळू शकतो.

मंडी हाऊसजवळ झाली अटक

रिपोर्टनुसार, नेहा बोरा यांना 18 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनात समिल होण्यासाठी जात असताना मंडी हाऊस येथून ताब्यात घेतलं. असा देखील दावा करण्यात येत आहे की, रात्री 8 वा. पासून नेहा यांच्याशी कोणत्याच प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही आणि वकिलांना भेटण्यासाठी देखील पोलीस नकार देत आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ समोर

विशाल ददलानीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नेहा बोरा यांना पोलीस ताब्यात घेत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया किंवा माहिती देण्यात आलेली नाही.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल