Dhadkan 2 : 26 वर्षांनंतर ‘धडकन 2’ येणार? नव्या चेहऱ्यांना संधी, अक्षय-शिल्पाला डच्चू?

धडकन 2 तयार करण्यासाठी निर्माते प्राथमिक स्तरावर विचार करत असल्याची माहिती आहे. मात्र या नव्या चित्रपटात जुन्या कलाकारांची जोडी पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे.

Dhadkan 2 : 26 वर्षांनंतर धडकन 2 येणार?  नव्या चेहऱ्यांना संधी, अक्षय-शिल्पाला डच्चू?
| Updated on: Nov 27, 2026 | 6:33 PM

धडकन हा सिनेमा 2000 मध्ये प्रदर्शित झाला अन् अल्पावधीतच या चित्रपटाने कलाकारांच्या मनात वेगळचं स्थान निर्माण केलं होतं. अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख असलेला हा चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात आहे. आता तब्बल 26 वर्षांनंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. धडकन 2 तयार करण्यासाठी निर्माते प्राथमिक स्तरावर विचार करत असल्याची माहिती आहे. मात्र या नव्या चित्रपटात जुन्या कलाकारांची जोडी पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे.

अक्षय आणि शिल्पा नव्या भागात नसण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, धडकन 2 हा पहिल्या चित्रपटाच्या कथेचा पुढचा भाग असणार नाही. प्रेम, नात्यांमधील गुंतागुंत आणि विरह या विषयांना केंद्रस्थानी ठेवून नवी कधी तयार केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या चित्रपटाची आठवण करून देणारा भावनिक अनुभव प्रेक्षकांना मिळू शकतोय मात्र कथानक वेगळं असणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Loading...

धडकन मध्ये अक्षय कुमारने राम, शिल्पा शेट्टीने अंजली आणि सुनील शेट्टीने देव ही व्यक्तिरेखा साकारली होती. या तिघांच्या अभिनयासह चित्रपटातील प्रेमकथेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण दुसऱ्या भागासाठी निर्माते नव्या कलाकारांना संधी देण्याच्या विचारतं असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी मु्ख्या भूमिकामध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे.

सुनील शेट्टी पाहूण्या कलाकाराची भूमिका

या नव्या चित्रपटात सुनील शेट्टी दिसू शकतो. ही सध्या चर्चेतील महत्त्वाची बाब आहे. पहिल्या भागातील देवच्या भूमिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली होती. आता धडकन 2 मध्ये त्याला छोटी म्हणजेच कॅमिओ भूमिका मिळणार असण्याची शक्यता आहे. मात्र इतर माहिती समोर आलेली नाही

दिग्दर्शनासाठी श्री नारायण सिंह यांचं नाव चर्चेत

पहिल्या धडकन 2 दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं, मात्र दुसऱ्या भागासाठी वेगळ्या दिगदर्शनाचा विचार सूरू आहे. टॉयलेट एक प्रेम कथा आणि बत्ती गुल मीटर चालू या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेले श्री नारायण सिंह यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. यासंदर्भात निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात प्राथमिक बोलणी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

अद्याप अधिकृत घोषणा नाही

धडकन 2 चं काम सध्या सुरूवातीच्या टप्पात असल्याची माहिती आहे. पटकथा आणि चित्रपटाच्या पूर्वतयारीवर काम सुरू असल्याचं वृत्त आहे. मुख्य भूमिकांसाठी नवीन कलाकारांचा शोध घेतला जात असला तरी अद्याप कोणाचीही निवड निश्चित झालेली नाही. निर्मात्यांनीही चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट कधी सुरू होणार त्यात कोणते कलाकार दिसणार याबाबत उत्सुकता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us