Jasprit Bumrah: बुमराहने अचानक बदलला गोलंदाजीचा अंदाज! रनअपमधील नव्या प्रयोगाने सगळेच चक्रावले; आयपीएलच्या पहिल्या दिवसांची आली आठवण
Jasprit Bumrah Changed Run-Up: बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीवरून सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या जुन्या आणि नवीन गोलंदाजी शैलीची तुलनात्मक छायाचित्रे शेअर केली जात आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळला जात आहे. जसप्रीत बुमराहला सामन्याच्या पहिल्या दिवशी एकही बळी घेता आला नाही, पण त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहसा बुमराह धावताना दोन्ही हातांत चेंडू घेऊन धावतो, पण यावेळी तो दोन्ही हात पसरून धावताना दिसला.
जसप्रीत बुमराहची गणना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फलंदाज त्याला घाबरतात. बुमराहचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे त्याची गोलंदाजीची शैली, जी इतर गोलंदाजांपेक्षा खूपच वेगळी आहे. जेव्हा बुमराह गोलंदाजीसाठी धावत येतो, तेव्हा तो चेंडू दोन्ही हातांनी पकडतो. इतर वेगवान गोलंदाजांप्रमाणे एकाच वेळी न होता, त्याच्या दोन्ही हातांची हालचाल होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान जसप्रीत बुमराह अनेकदा त्याच्या नेहमीच्या रन-अपपेक्षा वेगळ्या पद्धतीने धावताना दिसला. यावेळी त्याने चेंडू उजव्या हातात धरला होता आणि दुसरा हात पूर्णपणे मोकळा ठेवला होता. मात्र हा बदल केवळ रन-अपमध्येच होता. त्याने आपल्या जुन्याच शैलीत गोलंदाजी करणे सुरू ठेवले. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीत कोणताही बदल नव्हता. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बुमराह अशाच प्रकारचा रन-अप घेत असे.
Interesting. Bumrah trying a new run-up today
#Indvsnz https://t.co/pwCMlKO401
— Keshava (@Keshav367212606) November 27, 2026
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच षटकात टॉम लॅथमला पायचीत केले. मैदानातील पंचांनी लॅथमला बाद दिले, पण डीआरएसमुळे फलंदाज वाचला. त्यानंतर बुमराहने चांगली गोलंदाजी केली, पण त्याला यश मिळाले नाही. त्याने दिवसभरात 19 षटके गोलंदाजी केली आणि केवळ 37 धावा दिल्या. बुमराहचा इकॉनॉमी रेट 2 पेक्षा कमी होता.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या पाच गडी बाद 246 होती . खेळ संपला तेव्हा यष्टीरक्षक-फलंदाज टॉम ब्लेंडेल 53 धावांवर आणि ग्लेन फिलिप्स 36 धावांवर खेळत होते. कर्णधार टॉम लॅथमने (59) अर्धशतक झळकावले. भारताकडून आकाशदीपने दोन बळी घेतले, तर गुरनूर ब्रार, अंशुल कंबोज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
