AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : सहाव्या दिवशी ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर आणली कमाईची त्सुनामी; मोडला 4 चित्रपटांचा विक्रम

Dhurandhar 2 Box Office Collection : अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या चित्रपटाचा जगभरात डंका वाजतोय. प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी या चित्रपटाने छप्परफाड कमाई करत वर्ल्डवाइड टॉप 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवलं आहे.

Dhurandhar 2 : सहाव्या दिवशी 'धुरंधर 2'ने बॉक्स ऑफिसवर आणली कमाईची त्सुनामी; मोडला 4 चित्रपटांचा विक्रम
Ranveer Singhया वादात आणखी एक मुद्दा समोर आला आहे. काही प्रेक्षकांच्या मते, एका सीनमध्ये गोळी झाडली जाते, मात्र त्याचा आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की एडिट केलेला किंवा AI द्वारे तयार केलेला आहे, याबाबतही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 25, 2026 | 8:09 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 मार्च रोजी याचे पेड प्रीव्हू आयोजित करण्यात आले होते. डिसेंबर 2025 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि तेव्हापासूनच रणवीर सिंहच्या या सीक्वेलची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता हा चित्रपट देशभरातच नाही तर जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी ‘धुरंधर 2’ने जबरदस्त कमाई करत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.

‘धुरंधर 2’ची जगभरात किती कमाई?

‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: त्सुनामी आणली आहे. दररोज या चित्रपटाच्या कमाईचा वेग वाढतच असून प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी परदेशात जवळपास 231.57 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे आता ‘धुरंधर 2’च्या वर्ल्डवाइड कलेक्शनचा आकडा 919 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कमाईसह रणवीरच्या या चित्रपटाने चार चित्रपटांना मात दिली असून जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धुरंधर 2’ने रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या लाइफटाइम कमाईला मागे टाकलं आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 917 कोटी रुपये कमावले होते. तर सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ने जगभरात 918.18 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

जगभरात सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 भारतीय चित्रपट

दंगल- 1968.03 कोटी रुपये धुरंधर- 1350.83 कोटी रुपये जवान- 1148.32 कोटी रुपये पठाण- 1050.3 कोटी रुपये धुरंधर 2- 919 कोटी रुपये बजरंगी भाईजान- 918.18 कोटी रुपये अॅनिमल- 917.82 कोटी रुपये सिक्रेट सुपरस्टार- 875.78 कोटी रुपये स्त्री- 874.58 कोटी रुपये

‘धुरंधर 2’ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी भारतात 56.55 कोटी रुपये कमावले आहेत. यासह आतापर्यंत देशभरातील कमाईचा आकडा 575.67 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘धुरंधर 2’ने अवघ्या सहा दिवसांत कमाईचा 900 कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून सर्वांत जलद गतीने हा टप्पा गाठणारा चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट 1000 कोटींच्या विक्रमापासून फक्त काही पावलंच दूर आहे. ‘धुरंधर’ या पहिल्या भागाने एकूण 1300 कोटी रुपयांचा कमाई केली होती. पुढील काही दिवसांत सीक्वेल याचाही रेकॉर्ड मोडणार असल्याचं स्पष्ट दिसतंय.

Follow Us
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?