AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2: धुरंधर 2 बाबत मोठी बातमी, थेट गुन्हा दाखल, कोण येणार अडचणीत? काय घडलं नेमकं?

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' सिनेमाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. सिनेमाची शुटिंग सुरु असताना थेट गुन्हा दाखल करण्यात आला, कोणावर आणि का गुन्हा दाखल करण्यात आला? कोण येणार अडचणीत? काय घडलं नेमकं?

Dhurandhar 2: धुरंधर 2 बाबत मोठी बातमी, थेट गुन्हा दाखल, कोण येणार अडचणीत? काय घडलं नेमकं?
Dhurandhar
| Updated on: Feb 03, 2026 | 11:50 AM
Share

Dhurandhar 2:  अभिनेता रणवीर सिंग, अभिनेता अक्षय खन्ना स्टारर ‘धुरंधर’ सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ सिनेमा आजही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर देखील सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील विक्रम रचले आहेत. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली आहे. सध्या सर्वत्र ‘धुरंधर’ सिनेमाची चर्चा रंगलेली असताना, ‘धुरंधर 2’ सिनेमाबद्दल मोठी बातमी समोर येक आहे. ‘धुरंधर 2’ सिनेमा प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे… नेमकं काय घडलं आहे घ्या जाणून…

‘धुरंधर’ सिनेमाच्या यशानंतर प्रेक्षक ‘धुरंधर 2’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. पण ‘धुरंधर 2’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुंबई पोलिसांनी ‘धुरंधर 2’ या चित्रपटाच्या लोकेशन मॅनेजरवर दक्षिण मुंबईतील उच्च-सुरक्षा असलेल्या फोर्ट परिसरात आवश्यक परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

एमआरए मार्ग पोलीस ठाण्याने 1 फेब्रुवारी रोजी रिंकू राजपाल वाल्मिकी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 223 अंतर्गत “अधिकाऱ्यांचे कायदेशीर आदेश जाणीवपूर्वक न पाळल्याबद्दल” एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सिनेमाच्या क्रूने सीनचं चित्रीकरण करण्यासाठी ड्रोनचा वापर केला, परंतु त्यांच्याकडे त्यासाठी परवानगी नव्हती.

1 फेब्रुवारी रोजी अभिनेता संजय दत्तसह संपूर्ण क्रू चित्रीकरणासाठी जमला होता. त्या शेड्यूलचा तो तिसरा दिवस होता. 30 जानेवारीपासून, ऐतिहासिक फोर्ट परिसर पाकिस्तानमधील एका गजबजलेल्या जुन्या रस्त्यासारखा दिसण्यासाठी नाट्यमयरित्या बदलण्यात आला होता. दत्तने पांढरा पठाणी सूट घातला होता. हातात पिस्तूल घेऊन तो सेटवरून चालत होता आणि एक ड्रोन डोक्यावरून उडत त्या ॲक्शन-पॅक दृश्याचं चित्रीकरण सुरु होतं. अशात ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केल्यामुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

‘धुरंधर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:12 वाजता सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळत आहे.  आदित्य धर आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ‘उद्या 12:12’ अशी पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे दुपारी सीक्वेलचा टीझर प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?