AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2: 12:12 ची मोठी मिस्ट्री, धुरंधरच्या दिग्दर्शकाची घोषणा; अखेर संपणार प्रतीक्षा

दिग्दर्शक आदित्य धर आणि रणवीर सिंह यांच्या बहुप्रतीक्षित 'धुरंधर 2' या चित्रपटाचा टीझर आज (3 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Dhurandhar 2: 12:12 ची मोठी मिस्ट्री, धुरंधरच्या दिग्दर्शकाची घोषणा; अखेर संपणार प्रतीक्षा
Ranveer Singh in DhurandharImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2026 | 9:29 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या सीक्वेलविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या सीक्वेलविषयी आता आदित्यने मोठी हिंट दिली आहे. आज 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:12 वाजता हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. या टीझरविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण याची चर्चा करत आहे. ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका आधीच केला आहे आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही त्याची जबरदस्त क्रेझ पहायला मिळतेय. त्यामुळे सीक्वेलची कथा, भूमिका आणि नव्या ट्विस्टबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आदित्य धर आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ‘उद्या 12:12’ अशी पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे दुपारी सीक्वेलचा टीझर प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘धुरंधर’मध्ये गुप्तहेर हमजा अली मजारी या नावाने पाकिस्तानात जातो. ल्यारीमधील बलुच टोळीचा गुंड रेहमान डकैत याचा विश्वास जिंकून तो त्याच्या टोळीत सामील होतो. नंतर एसपी अस्लम चौधरीच्या मदतीने तो रेहमानच्या हत्येचा कट रचतो. तर दुसरीकडे संपूर्ण कराचीवर मला राज्य करायचं आहे, असं तो प्रेयसी यलिनासमोर म्हणतो. चित्रपटाच्या शेवटी हमजा एक गुप्त डायरी उघडतो, ज्यामध्ये ISI अधिकारी मेजर इक्बालसह अनेक हाय-प्रोफाइल नावं असतात. हे मिशन म्हणजे फक्त सुरुवात आहे, असं अजय सन्याल स्पष्ट करतात.

रणवीर सिंहची पोस्ट

‘धुरंधर’च्या पहिल्या भागात हमजाची पाकिस्तानमध्ये घुसखोरी आणि रेहमान डकैतचा खात्मा दाखवण्यात आला. तर आता सीक्वेलमध्ये हमजाची पार्श्वभूमी, त्याचा भूतकाळ, तो या गुप्त मोहिमेत कसा सहभागी झाला याबद्दलची कथा दाखवण्यात येईल. पहिल्या भागात अजय सन्यालच्या भूमिकेतील आर. माधवनचा स्क्रीनटाइम मर्यादित होता, परंतु दुसऱ्या भागात त्याची भूमिका मोठी असेल. रणवीरला तो प्रशिक्षण देताना दिसणार आहे. या सीक्वेलमध्ये बडे साहबच्या चेहऱ्यावरूनही पडदा उचलण्यात येईल. तो मेजर इक्बालच आहे की दुसरा कोणी, हे स्पष्ट होईल.

‘धुरंधर 2’मध्ये या प्रश्नांची उत्तरं मिळतील का?

  • ल्यारीवर राज्य करणार हमजा, बडे साहबचा चेहऱ्यावरून उठणार पडदा; 12:12 ला होणार मोठा धमाका
  • हमजा त्याची ओळख लपवून ल्यारीचा पूर्ण ताबा कसा घेणार?
  • हमजाच रेहमानला मारतो हे उजैर बलोचला कळेल का?
  • मेजर इक्बाल आणि एसपी अस्लम चौधरी हे हमजाची खरी ओळख शोधून काढू शकतील का?

Follow Us
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक