AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेच्चा! आता परीक्षांमध्ये पोहोचला ‘धुरंधर 2’; प्रश्नपत्रिका पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' सिनेमा 19 मार्च रोजी प्रदर्शित झाला. सर्वत्र सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. अशात परीक्षांमध्ये देखील 'धुरंधर 2' सिनेमावरुन प्रश्न विचारले जात आहेत. सध्या व्हायरल होत असलेली प्रश्न पत्रिक पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल...

अरेच्चा! आता परीक्षांमध्ये पोहोचला 'धुरंधर 2'; प्रश्नपत्रिका पाहून तुम्हीही व्हाल थक्क
| Updated on: Mar 29, 2026 | 1:57 PM
Share

अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमाची क्रेझ फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील पाहायला मिळत आहे… एवढंच नाही तर, सिनेमा आता परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेवर देखील येऊन पोहोचला आहे. सध्या सर्वत्र फक्त फक्त सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रश्नपत्रिकेची चर्चा रंगली आहे. प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल. प्रश्नपत्रिकेवर चक्क हमजा अली, रेहमान डकैत यांची नावे लिहिलेली आहे. प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर ‘धुरंधर’ सिनेमाचा प्रभाव शिक्षण क्षेत्रात पोहचल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका सर्वत्र व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. ‘Vidhzverse’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रश्नपत्रिका शेअर करण्यात आली आहे. एखाद्या प्रश्नासाठी पर्याय दर्शवण्यासाठी A, B, C किंवा X, Y, Z या अक्षरांचा वापर करण्यात येतो. पण व्हायरल होत असलेल्या प्रश्नपत्रिकेत SP चौधरी, रहमान डकैत, उझैर बलोच, अजय सन्याल, जमील जमाली आणि हमजा अली माझारी यांसारख्या नावांचा वापर करून प्रश्न तयार करण्यात आला आहे.

प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये, “अरे व्वा! आमचे ‘अकाउंट्स’चे सरसुद्धा ‘धुरंधर’चे चाहते निघाले!” असं लिहिलं आहे. पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… एकीकडे ‘धुरंधर 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे तर, दुसरीकडे व्हायरल होत असलेल्या प्रश्नपत्रिकेची चर्चा रंगली आहे.

धुरंधर 2 सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा मोठ्या पडद्यावर गाजत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसत आहे. जगभरात सिनेमाने 1141.22 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनानंतर नऊ दिवसांत सिनेमाने सर्व हीट सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

सिनेमात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांनी दमदार भूमिका साकारत सिनेमाला वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. पण ‘धुरंधर 2’ मध्ये  प्रेक्षकांना अभिनेता अक्षय खन्ना याची कमतरता भासली… आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटींवर मजल मारतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...