सर्जरीनंतर ब्लड टेस्ट रिपोर्टबद्दल ऐकताच दीपिकाला अश्रू अनावर; पती म्हणाला “खूप मोठी लढाई..”

अभिनेत्री दीपिका कक्करने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग शेअर केला असून त्यात तिने तिच्या ब्लड टेस्ट रिपोर्टची माहिती दिली आहे. यावेळी तिला अश्रू अनावर होतात. या रिपोर्टमध्ये काय आहे, ते जाणून घ्या..

सर्जरीनंतर ब्लड टेस्ट रिपोर्टबद्दल ऐकताच दीपिकाला अश्रू अनावर; पती म्हणाला खूप मोठी लढाई..
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2026 | 9:09 AM

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर लग्नानंतर ग्लॅमर विश्वापासून दूर गेली. मात्र तरीही ती आजही तिच्या युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. नुकत्याच एका व्लॉगमध्ये दीपिकाने तिच्या सिस्ट रिमूव्हल सर्जरीबद्दल अपडेट दिले आहेत. तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने सांगितलं की ईदनंतर जो ब्लड टेस्ट करायचा होता, त्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत. सुदैवाने हे रिपोर्ट्स नॉर्मल आल्याने दीपिका आणि शोएबसह चाहत्यांनीही दिलासा व्यक्त केला. तरीही पोटात सिस्टचं निदान झाल्यापासून प्रकृती ठीक नसल्याचं दीपिकाने म्हटलं आहे. हे सर्व सांगताना तिला अश्रू अनावर होतात. यावेळी शोएब दीपिकाला धीर देण्याचा प्रयत्न करतो. दीपिका तिच्या व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आरोग्याविषयीचे सर्व अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

या व्लॉगच्या सुरुवातीला शोएबने दीपिकाच्या ब्लड टेस्टविषयी सांगितलं आणि तिचे रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती दिली. “सर्वकाही नॉर्मल आहे. यावेळी काहीच बदल नाहीत. सर्व ठीक आहे. ही खूप मोठी लढाई आहे. रिपोर्ट्स जरी नॉर्मल आले तरी तिची प्रकृती बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. जे उपचार सुरू आहे, ते सुरूच राहणार आहेत. फक्त एक स्टेप पूर्ण झाली आहे. आता दीपिका लवकरात लवकर बरी व्हावी हीच देवाकडे प्रार्थना आहे”, असं तो म्हणाला. परंतु यावेळी दीपिकाच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती. आजारपणाबद्दल विचार करून चांगलं वाटत नसल्याची भावना तिने व्यक्त केली.

यावेळी शोएबने दीपिकाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला सांगितलं की, “आता घाबरण्याचं काही कारण नाही. सर्वकाही ठीक होईल.” त्याने पत्नीच्या डाएटविषयीची माहिती दिली. इतकंच नव्हे तर शोएबने तिला पुन्हा कुकिंग व्लॉग्स बनवण्याची प्रेरणा दिली. तेव्हा दीपिकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं. स्वयंपाक बनवल्याने एक वेगळाच आनंद मिळत असल्याचं ती सांगते.

रिपोर्ट्स नॉर्मल आल्यानंतर शोएब डॉक्टरांकडे जाऊन पुढील प्रक्रियेविषयीची माहिती जाणून घेणार आहे. याविषयी त्याने पुढे सांगितलं, “पुढील स्टेप्स, उपचारपद्धती, शरीर त्याला कसा प्रतिसाद देणार, त्याचे साइड इफेक्ट्स काय असू शकतात, कोणती काळजी घ्यावी लागेल.. या सर्व गोष्टींसाठी आम्हाला तयार राहावं लागेल.”

दीपिकाला आधी लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावरील सर्व उपचार योग्य पद्धतीने पार पडल्यानंतर तिच्या पोटात पुन्हा एक गाठ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यासाठी तिच्यावर पुन्हा सर्जरी करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us