AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra च्या बहिणीला दिग्दर्शकाने सर्वांसमोर केलं किस; अभिनेत्रीची अवस्था पाहून तुम्हीही म्हणाल…

Priyanka Chopra | कोणाचाही विचार न करता प्रियांका चोप्रा हिच्या बहिणीला दिग्दर्शकाने सर्वांसमोर केलं किस... 'अशी' झाली अभिनेत्रीची अवस्था... व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

Priyanka Chopra च्या बहिणीला दिग्दर्शकाने सर्वांसमोर केलं किस; अभिनेत्रीची अवस्था पाहून तुम्हीही म्हणाल...
| Updated on: Aug 30, 2023 | 12:32 PM
Share

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड विश्वातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ प्रेक्षकांना आवडतात, तर काही व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजलेली असते. एवढंच नाही व्हायरल व्हिडीओमुळे अनेक सेलिब्रिटींना ट्रोलिंकचा सामना करावा लागत आहे. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या बहिणीचा आहे. प्रियांका चोप्रा हिची बहीण आणि अभिनेत्री मन्नारा चोप्रा हिने ‘जिद’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या मन्नारा दाक्षिणात्य सिनेविश्वात सक्रिय आहे. सध्या सर्वत्र प्रियांका चोप्रा हिच्या बहिणीची चर्चा रंगत आहे.

मन्नारा चोप्रा सध्या टॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंका चोप्राची चुलत बहीण मनारा चोप्रा हिने २०१४ साली तेलुगू अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या मन्नारा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक रवीकुमार चौधरी यांनी ‘तिरगाबादरा सामी’च्या पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेत्रीच्या गालावर किस केलं.

व्हिडीओमध्ये अभिनेत्री दिग्दर्शक रवीकुमार चौधरी यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे. पण पोज देत असताना रवीकुमार चौधरी यांनी अभिनेत्रीला सर्वांसमोर गालावर किस केलं.. ज्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र खळबळ माजली आहे. व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

दिग्दर्शकाने किस केल्यानंतर अभिनेत्रीला देखील असहज वाटत होतं. पण मीडियासमोर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली नाही आणि हसताना दिसली. सध्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंटकरत प्रतिक्रिया दिली आहे. पण मन्नारा आणि रवीकुमार चौधरी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मन्नारा चोप्रा ही प्रियांका चोप्रा हिची चुलत बहीण आहे. मन्नारा हिच्यापूर्वी देसी गर्लेची बहीण परिणीती चोप्रा हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या परिणीती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. परिणीती लवकरच माजी खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या सर्वत्र प्रियांका आणि तिच्या बहिणींची चर्चा रंगत आहे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.