Big Boss-16 मधील पहिलं जोडपं माहितेय का? वाचा सविस्तर

1ऑक्टोबर व 2 ऑक्टोबर रोजी या नव्या शो चा ऑफिशिअल प्रोमो रिलीज होईल. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तब्बल 105 दिवस एका घरात ठेवण्यात येणार आहे. कलर्स वाहिनीवर रात्री 10 वाजता हा शो प्रसारित होणार आहे.

Big Boss-16 मधील पहिलं जोडपं माहितेय का? वाचा सविस्तर
Big Boss
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 01, 2022 | 11:47 AM

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक बघितला जाणारा रियॅलिटी शो म्हणजे बिग-बॉस (Big-Boss)होय. बिग बॉसच्या- 16 च्या सिझनला लवकरच सुरवात होत आहे. या नव्या सीझनचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salaman khan)या रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. दुसरीकडे या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे अद्याप समोर आलेली नाही. मात्र त्याचे प्रोमोसमोर आले आहे. त्यात स्पर्धकांचा चेहरा दिसत नाही.

कलर्स वाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या प्रोमोमध्ये सलमान खान   स्पर्धकांना ‘तुमच्या दोघांचं नेमकं नातं काय? ‘. यावर स्पर्धक   प्रियांकाने उत्तर दिले आहे. ती म्हणते ‘ ‘आमचे नाते इतरांच्या पेक्षा खूप वेगळे आहे’,  ‘भले आम्ही दोघे बोलत नसलो तरी एकमेकांची खूप काळजी घेतो’  यावर अभिनेता सलमानने क्युट म्हणत उत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रोमोनंतर स्पर्धक प्रियांका चहर व अंकित गुप्ता यांचे फॅन आनंदी झाले आहेत. टीव्ही इंडस्ट्रीत ‘उंडारिया’ या
मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. एवढंच नव्हे तर दोघांचेही सोशल मीडियावर अनेक फॅन पेजही असल्याचे दिसून आले आहे.

या  बिग-बॉसच्या 16  सिझनमधील स्पर्धकांची नावे अधिकृतरित्या जाहीर झालेली नाहीत. मात्र प्रोमो आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अनेकी स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. यामध्ये अब्दू रोजिक,निमृत कौर अहलुवालिया, गोरी नागोरी, प्रियांका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता अशी नवे समोर आली आहेत. लवकरच अधिकृतपणे नावांची यादीही जाहीर होईल.

येत्या 16  ऑक्टोबरपर्यंत हा शो सुरु होईल. आज 1ऑक्टोबर व 2 ऑक्टोबर रोजी या नव्या शो चा ऑफिशिअल प्रोमो रिलीज होईल. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तब्बल 105 दिवस एका घरात ठेवण्यात येणार आहे. कलर्स वाहिनीवर रात्री 10 वाजता हा शो प्रसारित होणार आहे.