Drishyam 3 Advance Booking : महाराष्ट्रात प्रदर्शनापूर्वीच ‘दृश्यम 3’ने रचला विक्रम, इतक्या कोटींची ॲडव्हान्स बुकिंग, होणार रेकॉर्डब्रेक कमाई
Drishyam 3 Advance Booking : प्रदर्शनापूर्वीच 'दृश्यम 3' सिनेमाने रचला मोठा विक्रम... ॲडव्हान्स बुकिंगमध्ये महाराष्ट्रात सिनेमाने मारली मोठी मजल... होणार रेकॉर्डब्रेक कमाई... आकडे अखेर समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा...

Drishyam 3 Advance Booking : अभिनेता अजय देवगण, जयदीर अहलावत आणि अभिनेत्री तब्बू स्टारर ‘दृश्यम 3’ सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील विजय साळगांवकर आणि त्याच्या कुटुंबियांची कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या क्राईम – ड्रामा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनापूर्वीच सिनेमाच्या तिकिटांची विक्री समोर येत आहे. गेल्या शनिवारी उशिरा ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आणि मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत, केवळ प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसासाठीच 2.20 लाख तिकिटांचं ॲडव्हान्स बुकिंग झालं आहे.
दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्या सिनेमाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहता, सिनेमा बक्कळ कमाई करेल असे संकेत वर्तवण्यात येत आहे. 2015 मध्ये रिलीज झालेला ‘दृश्यम’ आणि 2022 मध्ये आलेला ‘दृश्यम 2’ यांच्यानंतर, प्रेक्षकांची तिसऱ्या भागाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे. ही उत्सुकता तेव्हा आणखी वाढली, जेव्हा मेकर्सनी जाहीर केलं की यावेळी सिमाची कथा अभिनेते मोहनलाल यांच्या मल्याळम सिनेमापेक्षा फार वेगळी असेल.
सिनेमाच्या बजेटबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचं बजेट सुमारे 80 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. अशात सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या दिवसांतच सिनेमा मोठी कमाई करेल… सॅकल्लिकच्या (Sacnilk) अंदाजानुसार, ‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’ने पहिल्या विकेंडपर्यंतच्या ऍडव्हान्स बुकिंगमधून ब्लॉक सीटसह 17.07 कोटींची ग्रॉस कमाई केली आहे. तर ब्लॉक सीट वगळल्यास मंगळवार सकाळपर्यंत सिनेमाने 10.86 कोटींची प्री-सेल्स बुकिंग झाली आहे.
यातही पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवार 2 ऑक्टोबरसाठी 8.81 कोटींची ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे. अद्याप मंगळवार, बुधवार आणि गुरुवारचे ॲडव्हान्स बुकिंग बुकिंग बाकी आहे, त्यामुळे हा आकडा आणखी वेगाने वाढणार आहे. अशात कोणत्या राज्यात सिनेमाने अधिक ॲडव्हान्स बुकिंग केली आहे. याबद्दल देखील मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रदर्शनापूर्वी सिनेमाने मोठा विक्रम रचला आहे.
महाराष्ट्रात सिनेमाची शनिवार संध्याकाळपासून मंगळवार सकाळपर्यंत 2.87 कोटींची ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे. यानंतर दिल्लीचा नंबर लागतो, जिथे आतापर्यंत 2.14 कोटींची प्री-सेल्स बुकिंग झाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे, जेथे 63.75 लाखांची ग्रॉस कमाई केली आहे. शहरांबद्दल सांगायचं झालं तर, दिल्लीत सिनेमाचा अधिक बोलबाला दिसत आहे. दिल्लीत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 2.14 कोटींची बुकिंग झाली आहे. यानंतर मुंबईतून 1.70 कोटी आणि पुण्यातून 78.20 लाखांची कमाई झाली आहे. अशात आता सिनेमा किती कोटींपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
