Drishyam 3: शूटिंगच्या अवघे 7 दिवस आधी अक्षय खन्नाने का सोडला ‘दृश्यम 3’ ? डायरेक्टरने सौडलं मौन

पुढल्या महिन्यात दृश्यम 3 चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र यावेळेस अक्षय खन्ना या चित्रपटात दिसणार नाही. शूटिंग सुरू होण्याच्या 7 दिवस आधीच त्याने हा चित्रपट सोडला होता, ज्यावरून बराच वादही झाला. आता या सर्व मुद्यांवर दिग्दर्शकाने मौन सोडलं आहे.

Drishyam 3: शूटिंगच्या अवघे 7 दिवस आधी अक्षय खन्नाने का सोडला दृश्यम 3 ? डायरेक्टरने सौडलं मौन
Drishaym Movie
| Updated on: Sep 21, 2026 | 7:48 PM

अभिनेता अजय देवगणच्या लोकप्रिय, बहुचर्चित चित्रपटाचा पुढला भाग आता लौकरच येतोय. दृश्यम 3 चा तिसरा आणि शेवटचा भाग लौकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र हा चित्रपट अनाऊन्स  झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न येतोय, ते म्हणजे दुसऱ्या भागाप्रमाणे या चित्रपटाच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात अक्षय खन्ना का दिसणार नाही?. त्याने हा चित्रपट का सोडला ? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. यंदा दृश्यम 3 मध्ये अक्षय खन्नाऐवजी प्रकाश झा आणि जयदीप अहलावत सारखे स्टार कलाकार दिसणार आहेत. आता यासंदर्भात दृश्यम 3 चा डिरेक्टर आणि लेखक अभिषेक पाठकने मौन सोडलं असून संपूर्ण वादाबद्दल तो स्पष्टपणे बोलला आहे. दृश्यम 3 मध्ये अक्षय खन्ना का नाही आला, नेमकं काय बिनसलं हे त्याने सांगितलं. तसेच अक्षयच्या एक्झिटनंतर सगळं रायटिंग आणि इतर गोष्टींमध्ये काय बद्दल करण्यात आला, हेही नमूद केलं.

अक्षयने सोडला चित्रपट

डिसेंबर 2025 मध्ये, दृश्यम 3 चे मेकर्स आणि अभिनेता अक्षय खन्ना यांच्यात बरेच मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. क्रिएटिव्ह डिफरन्स आणि आर्थिक मुद्द्यांवरून झालेल्या मतभेदांमुळे अक्षयने हा चित्रपट सोडल्याचं वृत्त होतं. आता अभिषेकने त्यावर भाष्य केलं. एका वृत्तपत्राशी बोलताना, त्याने हा काळ अत्यंत विचित्र असल्याचं नमूद केलं, त्या परिस्थितीमुळे आपल्याला खूप दुःख झालं होतं, असंही तो म्हणाला.

त्यावर बोलताना अभिषेक म्हणाला,” मी घाबरलो नव्हतो; पण संपूर्ण टीम मात्र खूप अस्वस्थ झाली होती. हे कसलं वागणं आहे, असा प्रश्न मलाही पडला होता” असंही तो म्हणाला. दृश्यम 3 चं शूटिंग सुरू होण्याच्या अवघे सात दिवस आधीच अक्षयने चित्रपट सोडला असं वृत्त समोर आलं होतं. तो चित्रपटातून बागेक पडल्यामुळे निर्मात्यांसमोर एक मोठी नवी समस्या निर्माण झाली. अखेर निर्मात्यांनी अवघ्या दोन दिवसांत अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावतची निवड केली.

स्क्रिप्टही बदलली

दिग्दर्शक -लेखक असलेल्या अभिषेक पाठकने अभिनेता अक्षय खन्नाला डोळ्यांसमोर ठेवूनच पटकथा तयार केली होती. मात्र, चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच जेव्हा त्याने चित्रपट सोडला, तेव्हा त्यांना अगदी ऐनवेळी पटकथेतील काही भागांत फेरबदल करून ते पुन्हा लिहावे लागलं होतं.

जेव्हा अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावत यांची निवड झाली तेव्हा मी त्यांना फोन केला. तेव्हा जयदीपने सर्वात आधी विचारलं की कास्टिंग बदललं जातयं की खुद्द भूमिकाच; त्यावर अभिषेक पाठक याने स्पष्ट केले की ते पात्र बदललं जात आहे. जयदीपला पटकथा आवडली आणि पाच-सहा दिवसांतच सर्व गोष्टींची निश्चित झाल्या, असं त्यांनी नमूद केलं.

आपण काहीही रद्द करणार नाही, असं मी टीमला स्पष्टपणे सांगितलं होतं, असं अभिषेकने सांगितलं. शूटिंग सुरू व्हायला अवघे 7 दिवस शिल्लक होते. मी अखेर पटकथेत काही बदल केले आणि पुढील सर्व तयारी सुरू ठेवली असं तो म्हणाला. पण हे शूटिंग रद्द न करण्याचा निर्ण घेतला कारण या चित्रपटाशी सुमारे २०० लोक जोडलेले होते, सेट आधीच उभारला होता आणि अनेक लोकांचा उदरनिर्वाह या प्रकल्पावर अवलंबून होता, असंही अभिषेकने सांगितलं.

कधी रिलीज होणार पिक्चर?

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तब्बू, श्रिया शरन, इशिता दत्ता आणि रजत कपूरही दिसणार आहेत. त्यासोबतच जयदीप अहलावत, प्रकाश राज आणि सौरभ शुक्ला हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट पुढल्या महिन्यात, म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us