Drishyam 3 : ‘दृश्यम 3’मध्ये बदललं कास्टिंग; अक्षय खन्ना की जयदीप अहलावत, कोणाची संपत्ती अधिक ?
अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळी चित्रपटाची कथा मूळ मल्याळम चित्रपटापेक्षा वेगळी असणार आहे. ‘दृश्यम 2’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेल्या भूमिकेऐवजी आता जयदीप अहलावत एका नव्या क्राइम ब्रांच अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या सस्पेन्स- थ्रिलर फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. येत्या शुक्रवारी, 2 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीजज होणार आहे. यावेळी ‘दृश्यम 3’ची उत्सुकता आणखी वाढली आहे. कारण मोहनलाल यांच्या मूळ मल्याळम ‘दृश्यम’पेक्षा हिंदी चित्रपटाची कथा खूपच वेगळी असेल, असं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नव्हे तर या चित्रपटाच्या कास्टिंगमध्येही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावतची एन्ट्री
‘दृश्यम 2’मध्ये आयजी तरुण देशमुखची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचा (askahaye Khanna) ‘दृश्यम 3’मध्ये सहभाग नसेल. तर त्याच्या जागी अभिनेता जयदीप अहलावत (Jayeep Ahalwat) दिसणार आहे. मात्र, जयदीप हे अक्षय खन्नाची जुनी भूमिका साकारणार नसल्याचं समोर आलं आहे. कथेत एका नव्या क्राइम ब्रांच अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा सादर करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच शूटिंग सुरू होण्यापूर्वीच काही दिवस आधीच अक्षय खन्ना प्रोजेक्टमधून बाहेर पडला. त्यावरून बराच वादही झाला. अखेर दिग्दर्शक अभिषेक पाठकने जयदीप अहलावतशी चर्चा केली. जुन्या व्यक्तिरेखेत काम करायचं की नवीन पात्र तयार करायचं, यावर चर्चा झाल्यानंतर अवघ्या सात दिवसांत जयदीप यांच्यासाठी नवं पात्र तयार करण्यात आलं. त्यामुळे आता या नव्या भूमिकेत जयदीप अहलावत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
अभिनेता अक्षय खन्ना आणि जयदीप अहलावत यांच्यात श्रीमंत कोण, कोणाची संपत्ती जास्त आहे, ते जाणून घेऊया.
जयदीप अहलावतचं नेटवर्थ किती ?
‘पाताल लोक’, ‘राजी’ आणि ‘जाने जान’ यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमधून जयदीप अहलावत याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. ओटीटीसोबतच मोठ्या पडद्यावरही तो सातत्याने काम करत आहे. त्याच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स असून त्याने मानधनातही चांगलीच वाढ केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयदीप अहलावत ची एकूण संपत्ती 28 कोटी आहे. त्याने मुंबईत प्रीमिअम प्रॉपर्टी खरेदी केली. तसेच त्याच्याकडे 1.3 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची लग्झरी SUV मर्सिडीज-बेंज GLS ही कारही आहे.
अक्षय खन्नाची संपत्ती
3 दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेला अक्षय खन्ना मोजकेच चित्रपट करतो. दमदार अभिनयामुळे त्याने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय खन्नाची एकूण नेटवर्थ सुमारे 167 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मुंबईमध्ये त्याच्याकडे 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीज असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्याने नुकताच मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट करेदी केल्यातीही माहिती समोर आली.
उपलब्ध मीडिया रिपोर्ट्समधील आकडे पाहिल्यास, अक्षय खन्नाची अंदाजे संपत्ती 167 कोटी रुपये, तर जयदीप अहलावतची संपत्ती सुमारे 28 कोटी रुपये असल्याचं बोललं जातं. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कलाकारांच्या नेटवर्थमध्ये मोठी तफावत आहे. मात्र, जयदीप अहलावतचं करिअर सध्या वेगाने पुढे जात असून तो मोठ्या बजेटच्या चित्रपटांसोबतच प्रमुख भूमिकांमध्येही दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात त्याच्या कमाईत आणि संपत्तीत आणखी वाढ होऊ शकते.