AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Controversy : फास्ट अँड फ्युरियसमधून बाहेर पडला ‘द रॉक’ ड्वेन जॉन्सन, विन डिझेलला म्हणाला…

हॉलिवूड(Hollywood)ची सुपरहिट चित्रपट मालिका 'फास्ट अँड फ्युरियस'(Fast And Furious)ला प्रचंड फॅन फॉलोइंग भारतातही आहे. हॉलिवूडचा दिग्गज ड्वेन जॉन्सन(Dwayne Johnson)नंही 2011मध्ये 'फास्ट फाइव्ह' या मालिकेत ड्वेन जॉन्सनची मुख्य भूमिका केली होती.

Controversy : फास्ट अँड फ्युरियसमधून बाहेर पडला ‘द रॉक’ ड्वेन जॉन्सन, विन डिझेलला म्हणाला...
Dwayne Johnson
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 7:18 PM
Share

मुंबई : हॉलिवूड(Hollywood)ची सुपरहिट चित्रपट मालिका ‘फास्ट अँड फ्युरियस'(Fast And Furious)ला प्रचंड फॅन फॉलोइंग भारतातही आहे. या चित्रपटातल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं प्रेम लाभतं. हॉलिवूडचा दिग्गज ड्वेन जॉन्सन(Dwayne Johnson)नंही 2011मध्ये ‘फास्ट फाइव्ह’ या मालिकेत ड्वेन जॉन्सनची मुख्य भूमिका केली होती.

विन डिझेलसोबत ड्वेन जॉन्सनचं कोल्ड वॉर त्याची भूमिका चाहत्यांनाही खूप आवडली. बऱ्याच दिवसांपासून अशी बातमी होती, की विन डिझेलसोबत ड्वेन जॉन्सनचं शीतयुद्ध सुरू आहे, त्यामुळे जॉन्सननं या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, याची पुष्टी अजून झाली नाही, पण आता ड्वेन जॉन्सननं यात परतण्यासंदर्भात वक्तव्य केलंय.

‘फास्ट अँड फ्युरियस’ 10चा भाग असणार नाही ड्वेन जॉन्सन हा असा स्टार आहे, ज्याचे चाहते लाखो नाही तर जगभरात करोडोंमध्ये आहेत. केवळ कुस्तीच्याच नव्हे तर अभिनयातूनही त्यांची चांगली फॅन फॉलोइंग आहे. फास्ट अँड फ्युरियसमधील त्याच्या कामाचं कौतुक झालं. परंतु को-स्टार विन डिझेलसोबत झालेल्या वादामुळे त्यानं हिट सीरिजच्या 10व्या सीझनपासून स्वतःला दूर केलं आहे. आता जेव्हा सीएनएननं या विषयावर त्याला विचारलं, तेव्हा तो म्हणाला, की मी फ्रेंचायझीमध्ये परतणार नाही.

View this post on Instagram

A post shared by therock (@therock)

दोघांमध्ये दुरावा ड्वेन जॉन्सन म्हणाला, की मी माझ्या शब्दांवर ठाम होतो आणि मी नेहमीच कलाकारांना पाठिंबा देईन आणि फ्रँचायझी यशस्वी होण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहीन. 2016मध्ये ‘द फेट ऑफ द फ्युरियस’दरम्यान विन डिझेल आणि ड्वेन जॉन्सनमध्ये भांडण झालं होतं. तेव्हापासून या दोन अॅक्शन स्टार्समध्ये दुरावा निर्माण झालाय. खरं तर, ‘द फेट अँड फ्युरियस'(The Fate and Furious)च्या शूटिंगच्या शेवटच्या आठवड्यात, द रॉकनं सोशल मीडियावर पोस्ट करून डिझेलच्या व्यावसायिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दरम्यान, काहीही झालं तरी फास्ट अँड फ्युरियसमधली जॉन्सनची अनुपस्थिती त्याच्या चाहत्यांना निराश करेल.

Shilpa Shettyची सर्वांसमोर केली थट्टा; मग शिल्पानंही दिलं जशास तसं उत्तर, पाहा VIDEO

Sushmita Senनं सांगितलं रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपचं कारण; म्हणाली, अशा गोष्टींचा विचार करायला लागले तर…

Salman Khan Birthday Gifts : सलमान खानला त्याच्या वाढदिवशी मिळाल्या करोडोंच्या भेटवस्तू, सर्वात महागडं गिफ्ट कोणी दिलं?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.