AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आय अ‍ॅम डेड इनसाईड, दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंड रीना रॉयची भावनिक पोस्ट

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचे (Deep Sidhu) एका कार अपघातात 15 फेब्रुवारी रोजी निधन झाले. हा अपघात जेव्हा घडला तेव्हा त्याची गर्लफ्रेंड रीना रॉय देखील त्याच्यासोबत त्या कारमध्ये होती. रीना रॉयने दीपच्या मृत्यूनंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

आय अ‍ॅम डेड इनसाईड, दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंड रीना रॉयची भावनिक पोस्ट
दीप सिद्धू आणि रीना रॉय
| Updated on: Feb 17, 2022 | 5:52 PM
Share

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचे (Deep Sidhu) एका कार अपघातात 15 फेब्रुवारी रोजी निधन झाले. हा अपघात जेव्हा घडला तेव्हा त्याची गर्लफ्रेंड रीना रॉय देखील त्याच्यासोबत त्या कारमध्ये होती. मात्र या कार अपघातात रीना रॉय (Reena Roy) थोडक्यात बचावली, तर दीप सिद्धूचे निधन झाले. दिपू सिद्धू हा हरियाणाकडून (Haryana) पंजाबच्या दिशेने निघाला होता. याचदरम्यान हरियाणाच्या खरखोडा परिसरात कुंडली – मनेसर महामार्गावर हा अपघात झाला. अभिनेता दीप सिद्धूच्या अचानक जाणाने त्याच्या चहात्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याची गर्लफ्रेंड रीना रॉय अद्यापही या अपघातातून सावरू शकलेली नाही. रीनाने तिचे आणि दीपचे काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. मी तुझ्या मृत्यूमुळे खचले असल्याचं रीनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोस्टमध्ये रीनाने नेमकं काय म्हटले?

दीपच्या मृत्यूनंतर रीनाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, तु मला वचन दिले होते, की आपन दोघांनी सोबत जगायचं, मग तु मला अर्ध्यावर सोडून का गेलास?. मी आज रुग्णालयातील बेडवर पडून तुला आठवते आहे. तु माझ्या हृदयाची स्पदने आहेस. आपण दोघांनी एकत्र मिळून भविष्यातील किती योजना आखल्या होत्या. त्या आपण दोघांनी सोबत मिळून पूर्ण करण्याचे ठरते होते. परंतु तु मला अर्ध्यावरच सोडून गेलास. तु परत केव्हा येणार? अशी भावनिक पोस्ट रीना रॉयने लिहिली आहे.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात सहभागाचा आरोप

दीप सिद्धू हा एक पंजाबी अभिनेता होता. त्याने ‘रमता जोगी’, ‘जोरा 10 नंबररिया’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या वर्षी तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात सहभागी झाल्याने दीप सिद्धू चांगलाच चर्चेत आला होता. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी झालेल्या लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप देखील त्याच्यावर आहे.

संबंधित बातम्या

Bappi Lahiri Funeral Highlights : मुलगा बप्पाने दिली मुखाग्नी; बप्पीदा पंचतत्वात विलीन विलीन

2 दिवसानंतर फरहान शिबानीचं लग्न, खंडाळ्यातलं फार्म हाऊस सजवलं; मोजक्या लोकांना आमंत्रण

बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून डोसे बनवून घ्यायचे, अमृतांच्या उत्तरावर संकर्षण म्हणतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.