कपडे फाडले, फोन खेचला…, रस्त्यावर अभिनेत्रीला घेरलं, धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल

Viral Video | भररस्त्यात अभिनेत्रीवर आला धक्कादायक प्रसंग, भांडणं झाली, कपडे फाडले, फोन खेचला पण कोणी काही बोललं नाही, व्हिडीओ व्हायरल... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल...

कपडे फाडले,  फोन खेचला..., रस्त्यावर अभिनेत्रीला घेरलं, धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Feb 28, 2024 | 11:08 AM

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखली मोठा धक्का बसेल. तेलगू अभिनेत्री सौम्या जानू एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, अभिनेत्री कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक होमगार्डला मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री चुकीच्या बाजूने (Wrong Way) स्वतःची कार चालवत होता. अशात अभिनेत्रीला पोलिसांनी पकडल्यानंतर सौम्या पोलिसांसोबत भांडू लागली. ही घटना हैदराबादच्या पॉश बंजारा हिल्स भागातील आहे. सौम्या आणि ट्रॅफिक गार्डच्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सौम्या जानू हिने ट्राफीक गार्डला केली मारहाण…

व्हिडीओनुसार, सदर घटना शनिवारी रात्री 8.24 मिनिटांची आहे. व्हिडीओमध्ये ट्रॅफिक गार्ड आणि अभिनेत्री भोवती अनेक नागरिक आहेत. पण कोणीच त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. मोठ-मोठ्याने वाद घालत असताना अभिनेत्रीने ट्रॅफिक गार्डला मारहाण केली. त्यांचे कपडे फाडले एवढंच नाही तर, फोन देखील खेचून घेतला…

 

 

प्रकरणानंतर, ट्रॅफिक होमगार्डने बंजाराहिल्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा वापर करून घटनेची माहिती दिली आणि पुरावे सादर केले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला. एवढंच नाहीतर, सौम्या जानूवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने एका स्थानिक वाहिनीशी संपर्क साधला. अभिनेत्रीने माझं काहीही चूकलं नाही… असं म्हणत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. अद्याप अभिनेत्रीची चौकशी झालेली नाही. पण सौम्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.