AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mika Singh | मीका सिंग याची प्रकृती खालावली, तब्बल 15 कोटींचे नुकसान, चाहते चिंतेत, वाचा नेमके काय घडले?

बाॅलिवूड फेमस गायक मीका सिंग याच्याबद्दक अत्यंत मोठी अपडेट पुढे येत आहे. मीका सिंग याची तब्येत खराब झालीये. मीका सिंग याची तब्येत खराब झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. अनेकांनी मीका सिंग याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना देखील केलीये.

Mika Singh | मीका सिंग याची प्रकृती खालावली, तब्बल 15 कोटींचे नुकसान, चाहते चिंतेत, वाचा नेमके काय घडले?
| Updated on: Aug 23, 2023 | 9:54 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा फेमस गायक मीका सिंग हा नेहमीच चर्चेत असतो. मीका सिंग (Mika Singh) हा बिग बाॅस ओटीटी 2 च्या फिनालेमध्ये देखील पोहचला होता. यावेळी मीका सिंग हा घरातील सदस्यांसोबत धमाल करताना दिसला. मीका सिंग याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मीका सिंग हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतो आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. विशेष म्हणजे मीका सिंग याचे चाहते हे फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही आहेत.

नुकताच आता मीका सिंग याच्याबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे येत आहे. स्वत: मीका सिंग याने याबद्दल माहिती शेअर केलीये. मीका सिंग याची तब्येत खराब झालीये. इतकेच नाही तर मीका सिंग याला बोलणे देखील कठीण झाले आहे. मीका सिंग याला मोठा फटका यामुळे बसला आहे. तब्बल 15 कोटींचे नुकसान मीका सिंग याचे झाले आहे.

मीका सिंग हा जगभराच्या दाैऱ्यावर होता. काही दिवसांपासून सतत कॉन्सर्ट करत असल्याने त्याचा वाईट परिणाम हा त्याच्या आरोग्यावर झाला. धक्कादायक म्हणजे असा प्रकार मीका सिंग याच्यासोबत पहिल्यांदाच घडला आणि त्याची तब्येत इतकी जास्त खराब झाली की, त्याला कॉन्सर्ट न करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला.

अमेरिकेनंतर बाली, मलेशिया, सिंगापुर, थाईलॅंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये त्याच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यूएसनंतर मीका सिंग याचे सतत कॉन्सर्ट झाले. यामुळे आराम करायला अजिबातच वेळ मिळाला नाही आणि त्याचा परिणाम थेट आरोग्यावर झाला. आता डाॅक्टरांनी मीका सिंग याला आराम करण्याचा सल्ला दिलाय.

इतके नाही तर मीका सिंग याला अजिबातच प्रवास देखील करायचा नाहीये. यामुळे आता सध्याच त्याला भारतामध्ये येणे देखील शक्य नाहीये. कॉन्सर्ट रद्द झाल्याने त्याचा मोठा फटका त्याच्या टिमला बसला आहे आणि तब्बल 15 कोटींचे नुकसान झाले आहे. शोचे तिकिटे विकली गेली होती. बऱ्यापैकी तिकिटांची रक्कम परत देण्यात आलीये.

अचानक तब्येत खराब झाल्याने त्याला मोठा फटका हा मीका सिंह याला बसला आहे. आता मीका सिंग याच्या खराब झालेल्या आरोग्यामुळे चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. मीका सिंग याच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहते हे मोठ्या प्रमाणात प्रार्थना करताना देखील दिसत आहेत.

Follow Us
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?