AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 मध्ये दाखवलेला दाऊद इब्राहिमचा आजार 80 % खरा, दहशतीत गेलं 90 चं दशक कारण…, बड्या व्यक्तीकडून खळबळजनक दावा

Dhurandhar 2 Dawood Ibrahim Health : 90 च्या दशकात सेलिब्रिटी, उद्योजकांपासून सामान्य जनतेलाही दाऊद इब्राहिम द्यायचा त्रास, 'धुरंधर 2' मध्ये दाखवलेला त्याचा आजार 80 % खरा... एका बड्या व्यक्तीकडून मोठी माहिती समोर...

Dhurandhar 2 मध्ये दाखवलेला दाऊद इब्राहिमचा आजार 80 % खरा, दहशतीत गेलं 90 चं दशक कारण..., बड्या व्यक्तीकडून खळबळजनक दावा
Dawood Ibrahim
| Updated on: May 21, 2026 | 1:17 PM
Share

Dhurandhar 2 Dawood Ibrahim Health : मुंबई पोलिसांचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि शार्प ऑफिसर प्रदीप शर्मा यांच्यावर जीवनावर आधारित ‘अब तक 112’ सिनेमामुळे चर्चे आहेत. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिम आणि 90 दकातील त्याच्या दहशतीबद्दल मोठा खुलासा केला आहे. एक काळ असा होता जेव्हा प्रदीप शर्मा यांसारख्या अधिकाऱ्यांनी कुख्यात गुंडांचा मोर्चा सांभाळला होता… प्रदीप शर्मा यांनी स्वतःचं आयुष्य, पोलीस सिस्टम, अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडबद्दल अनेक खुलासे केले आहे…. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रदीप शर्मा यांनी केलेल्या दाव्यांची चर्चा रंगली आहे.

पोलीस अधिकारी होण्याची प्रदीप शर्मा यांची लहानपणापासून इच्छा होती आणि त्यांनी मनातील इच्छा पूर्ण देखील केली. पोलीस खात्यात नोकरी करत त्यांनी मोठ्या – मोठ्या गुंडांना गुडघ्यावर आणलं. प्रदीप शर्मा म्हणाले, ’90 दशकात मुंबई पूर्ण अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली होती. दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी आणि अमर नाइक यांचा मुंबईवर ताबा होता.’

‘प्रत्येक दिवशी शुटआउटच्या घटना समोर यायच्या. मोठ्या उद्योजकांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकीचे फोन यायचे. सामान्य जनतेमध्ये देखील भीतीचं वातावरण होतं. जर कोणी कार खरेदी केली किंवा नवीन घर घेतलं की, गँगस्टरचा त्यांना फोन जायचा आणि ते पैशांची मागणी करायचे. अशी परिस्थिती होती की, लोक दाऊदच्या नावाने लॉकेट आणि ब्रेसलेट बनलत होते… ‘

प्रदीप शर्मा यांनी असंही सांगितलं की, बॉलिवूड इंडस्ट्रीच्या लोकांमध्ये देखील भीतीचं वातावरण होतं. गँगस्टर अभिनेते आणि निर्मात्यांना धमकवायचे. त्यांचं ऐकलं नाही तर, सेलिब्रिटींवर हल्ला करायचे… त्यांच्या दहशतीमुळे अनेक कलाकार गँगस्टर जे बोलतील ते ऐकायचे…

त्यावेळी प्रदीप शर्मा खंडणी विरोधी पथकात होते आणि चित्रपटसृष्टीतील अनेक लोक त्यांच्याकडे मदतीसाठी यायचे. त्यांनी असंही सांगितलं की, ‘धुरंधर 2’ सारख्या सिनेमांमध्ये आणि सीरिजमध्ये दाऊद इब्राहिमला आजारी दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात तो बऱ्याच अंशी तसाच आहे. असं देखील प्रदीप शर्मा म्हणाले.

मुलाखतीत प्रदीप शर्मा यांनी पोलीस सिस्टमबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे. प्रदीप शर्मा म्हणाले, ‘प्रामाणिक आणि मेहनती पोलीस अधिकाऱ्यांचा सिस्टम वेळ पडली की वापर करते आणि त्यानंतर लक्ष देखील देत नाही…’ एक जुनी केस सांगत प्रदीप शर्मा म्हणाले, ‘जेजे हॉस्पिटलमध्ये शूटआऊट झाल्यानंतर, एका रात्रीत आरोपींना पकडण्याचा दबाव होता आणि पोलिसांना ते ऑपरेशन पूर्ण देखील केलं. पण त्यानंतर छोटी चूक झाली तेव्हा सिस्टमने पाठ फिरवली…’ असं देखील प्रदीप शर्मा म्हणाले.

Follow Us
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग