AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी अजूनही तुझा नवरा आहे समजलं ना…आकांक्षाच्या घटस्फोटाच्या निर्णयावर गौरव खन्ना भडकला; Lockup 2 मधील Video Viral

गौरव खन्ना आणि आकांक्षा चामोला यांचा घटस्फोट होणार आहे अशी घोषणा अभिनेत्री आकांक्षानेच केली होती. आता आकांक्षाला भेटण्यासाठी गौरव लॉकअप 2 सिझनमध्ये गेला होता. तेव्हा गौरवने जी प्रतिक्रिया दिली ती आता व्हायरल होत आहे.

मी अजूनही तुझा नवरा आहे समजलं ना...आकांक्षाच्या घटस्फोटाच्या निर्णयावर गौरव खन्ना भडकला; Lockup 2 मधील Video Viral
gaurav khhanaa and akanksha chamola
| Updated on: Jul 10, 2026 | 12:04 PM
Share

‘लॉक अप 2’ या रिॲलिटी शोमध्ये सध्या जोरदार नाट्यमय गोष्टी घडताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना नुकताच या शोच्या एका एपिसोडमध्ये दिसला. पत्नी आकांक्षा चमोलाने घटस्फोटाची घोषणा केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपली नाराजी व्यक्त करताना गौरव आकांक्षाला स्पष्टपणे म्हणाले, “आपण या विषयावर फक्त आपापसातच चर्चा केली आहे. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर अजून कोणत्याही न्यायालयात सह्या झालेल्या नाहीत, तसेच आपला घटस्फोट कायदेशीररित्या अंतिम झालेला नाही. जेव्हा गौरवने आकांक्षाला याबद्दल विचारले, तेव्हा ती म्हणाली, “तु ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणार होता, तेव्हा हा निर्णय घेतला होता.” आकांक्षाला मध्येच थांबवत गौरव म्हणाला, “तू शोमध्ये जाण्याच्या अवघ्या सात दिवस आधी माझ्यासाठी ही मोठी अडचण निर्माण केली आहेस. शांत डोक्याने विचार कर. अशा परिस्थितीत कोणी काय करेल?” मी तिथे जाऊन माझ्या धोकादायक स्टंटवर लक्ष केंद्रित करू की माझ्या मनात सुरू असलेल्या प्रचंड गोंधळाला हाताळू? एकाच वेळी दोन्ही गोष्टी सांभाळणे माझ्यासाठी खूप कठीण होते.”

तो पुढे म्हणाला, “बरं, त्या घटनेला आता बराच काळ लोटला आहे. त्यावेळी आमच्यात जे काही घडलं होतं, आम्ही पुढे निघून गेलो आहोत.” यानंतर, शोची होस्ट फराह खानने गौरव आणि आकांक्षाला एकमेकांशी बोलण्यासाठी तिची केबिन दिली. केबिनमध्ये प्रवेश करताच गौरव आकांक्षाशी मनमोकळेपणाने बोलला. गौरव म्हणाला, “मे महिन्यात, जेव्हा मी माझ्या नवीन शोसाठी निघत होतो, तेव्हा याबद्दल बोललो होतो. पण आता बाहेरच्या लोकांना असं वाटतंय की जणू काही आमचा वर्षभरापूर्वीच घटस्फोट झाला आहे. लोक वाट्टेल ते तर्कवितर्क लावत आहेत.”

आकांक्षाशी बोलताना गौरव म्हणाला की, “बाहेरचे लोक वाट्टेल ते तर्कवितर्क लावत आहेत. लोक ज्या प्रकारे या संपूर्ण परिस्थितीकडे पाहत आहेत, ते पाहून मला खरंच धक्का बसला आहे. प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे गोष्टी रचत आहे आणि सोशल मीडियावर किंवा इतरत्र त्यांच्या मनात जे काही येईल ते लिहित आहे. अशा खोट्या दाव्यांचा सत्याशी काहीही संबंध नाही. लोक विचार न करता त्यांच्या नात्यावर बोट दाखवत आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे.  कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल अशी विधाने केली जाऊ नयेत.  तुझ्याबद्दल कोणी एक शब्दही बोललेला मी सहन करू शकत नाही. कायदेशीररित्या, आपण अजूनही विवाहित आहोत आणि मी तुझा नवरा आहे. ज्या व्यक्तीसोबत मी होतो किंवा अजूनही आहे, तिच्याबद्दल कोणीही काही वाईट बोललेले मला आवडत नाही.” गौरवने ज्यापद्धतीने परिस्थिती हाताळली त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow Us
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ