AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oscars: ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप; भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड, मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी

Gondhal Movie: ऑस्करच्या ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ श्रेणीमध्ये जगभरातील विविध देशांमधून आलेल्या चित्रपटांचा विचार केला जातो. भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याने ‘गोंधळ’ आता पुढील प्रक्रियेत सहभागी होणार आहे.

Oscars: 'गोंधळ'ची ऑस्करकडे झेप; भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड, मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी
गोंधळ चित्रपटImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2026 | 4:03 PM
Share

Gondhal Movie: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी थ्रिलर चित्रपटाची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या श्रेणीत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘गोंधळ’ची निवड झाली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (FFI) ही अधिकृत घोषणा केली आहे. ‘गोंधळ’च्या ऑस्कर प्रवेशामुळे मराठी सिनेसृष्टीचं नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचलं आहे. मराठी भाषेतील चित्रपटांना आशय, मांडणी आणि प्रयोगशीलतेसाठी देशभरातून यापूर्वीही दाद मिळाली आहे. आता ‘गोंधळ’च्या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.

‘गोंधळ’ची ऑस्करसाठी निवड

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून दरवर्षी ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी भारताकडून एका चित्रपटाची निवड केली जाते. यंदा या निवडीसाठी विविध भारतीय चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दिग्दर्शक संतोष डावखर आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘गोंधळ’ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या 20 टक्के प्रदेशात ‘कांतारा’मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात ‘दशावतार’ला मोठं स्थान आहे. मात्र ‘गोंधळ’ ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल 80 टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे.

वरा–नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या ‘गोंधळ’ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहाणारी कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहाता अंधश्रद्धा, कुटुंबातील नात्यांचे संघर्ष, समाजात बदलणारे दृष्टिकोन आणि माणसांच्या मनात दडलेला रहस्याचा धागा यांचाही वेध घेते. भव्य सादरीकरण, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक दृष्टीने उत्तम बांधणी यामुळे ‘गोंधळ’ मराठी संस्कृतीचं मूळ जागतिक प्रेक्षकांसमोर ताकदीने सादर करणारा ठरतोय.

चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं