AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मै जावांगा’,  होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याचा अफलातून डान्स, पाहा व्हिडीओ…

आजकाल लग्नसमारंभाच्या सगळ्या कार्यक्रमांची पूर्ण तयारी करतात. त्यामुळे यातील काही काम कमी होतात. त्यामुळे दोन्ही घरातील लोकांना बराच मोकळा वेळ मिळतो. यावेळात ते खास दिवसाला आणखी अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आला आहे.

Video | ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मै जावांगा’,  होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याचा अफलातून डान्स, पाहा व्हिडीओ...
होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याचा अफलातून डान्स
| Updated on: Mar 28, 2021 | 3:58 PM
Share

मुंबई : लग्नसोहळा म्हणजे विधी, कार्यक्रम आणि मानपानाची धावपळ… या काळात लग्नघरात उत्साह आणि ताण एकत्र दिसून येतो. ज्या दिवशी हा लग्नसोहळा असतो, त्या दिवशी तर कामांची लगबग सुरु असते. पण एकूणच सगळं उत्साहाचं वातावरण असल्याने हा ताण अगदीच निवळून जातो. आजकाल लग्नसमारंभाच्या सगळ्या कार्यक्रमांची पूर्ण तयारी करतात. त्यामुळे यातील काही काम कमी होतात. त्यामुळे दोन्ही घरातील लोकांना बराच मोकळा वेळ मिळतो. यावेळात ते खास दिवसाला आणखी अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याचा अफलातून डान्स केला आहे (groom perform for his wife to be  Wedding dance goes Viral on internet).

हल्ली लग्नात, साखरपुड्यात वधू आणि वर या दोन्ही घरातील लोकांचा डान्स हा असतोच! यात घरातील लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच हौशेने सहभागी होतात. त्यातही वर आपल्या वधूसाठी आणि वधू आपल्या होणाऱ्या पतीसाठी खास नृत्याची तयारी करत असेल, तर या सोहळ्याला आणखी चार चांद लागतात. या लग्नसोहळ्यातही नवरदेवाने त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी अनेक गाण्यांवर ठेका धरला होता.

पाहा हा अफलातून डान्स

नवरदेवाने त्याच्या नववधूसाठी केलेला हा डान्स फार लोकप्रिय ठरला होता. लग्नात बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकत या नवरदेवाने अगदी धमाल उडवून दिली होती. इतकी धमाल की, नववधूला देखील आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. या व्हिडीओ ही नववधू आणि तिच्या करवल्या स्टेजच्या समोर उभ्या दिसतात. तर, समोरील स्टेजवर नवरदेव आणि त्याच्या घरातील मंडळी हा अफलातून डान्स परफॉर्मन्स देत आहेत (groom perform for his wife to be  Wedding dance goes Viral on internet).

शाहरुखच्या आवाजात नवरदेवाची एंट्री!

या परफॉर्मन्समध्ये गाण्याच्या आधी शाहरूख खानच्या आवाजातील एक मोनोलॉग सुरू होतो. हळूहळू या मोनोलॉगबरोबर नवरदेवाची एंट्री होते. पाठी बसून राहिलेली वऱ्हाडी मंडळीसुद्धा उत्सुकतेमुळे उभे राहिलेले असतात. ‘साजन जी घर आए, दुल्हन क्यों शर्माए’ या गाण्यावर नवरदेवाचं जल्लोषात स्वागत होतं. नवरदेव या गाण्यावर डान्स सादर करतो. मग दुसरं गाणं सुरू होतं. यावेळी आजूबाजूला असलेले डान्सर मंडळी बदलतात. ‘मुझसे शादी करोगी’ हे गाणं सुरु होतं. या सगळ्यात हरवून गेलेल्या नववधूच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू दाटून येतात. नववधूचे स्टायलिश फोटो घेऊन वऱ्हाडी मंडळी नाचत असतात तर, नवरदेव हातात फुलांची माळा घेऊन येतो. ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मै जावांगा’ या गाण्यावर अखेर वरमाला एकमेकांच्या गळ्यात घातली जाते. या जोडीचा विशेषतः नवरदेवाचा अफलातून डान्स पाहून, आपल्या लग्नात आपल्याही होणाऱ्या नवऱ्याने असेच काहीतरी खास करावे, असे नक्कीच वाटेल.

(groom perform for his wife to be  Wedding dance goes Viral on internet)

हेही वाचा :

Video | ‘हे’ लग्न पाहून सगळे अवाक्, एवढे योगायोग कसे? सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

Sell Smartphone: जुना मोबाईल चांगल्या किंमतीला विकायचाय; मग ‘या’ 4 वेबसाईटस पाहाच

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.