Sell Smartphone: जुना मोबाईल चांगल्या किंमतीला विकायचाय; मग ‘या’ 4 वेबसाईटस पाहाच

कधीतरी एखादा स्मार्टफोन घेतल्यानंतर तो मनासारखा नसल्यास पश्चाताप होत राहतो. | How to sell used smartphone

Sell Smartphone: जुना मोबाईल चांगल्या किंमतीला विकायचाय; मग 'या' 4 वेबसाईटस पाहाच
'या' 4 वेबसाइटवर विका जुने स्मार्टफोन

मुंबई: हल्लीच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत तुमच्याकडील स्मार्टफोनसारखी (Smartphone) गॅझेटस वर्षभरात आऊटडेटेड वाटायला लागतात. दर काही दिवसांनी स्मार्टफोनमध्ये येणारी नवी फिचर्स आपल्याही मोबाईलमध्ये हवीत, असे वाटू लागते. कधीतरी एखादा स्मार्टफोन घेतल्यानंतर तो मनासारखा नसल्यास पश्चाताप होत राहतो. त्यामुळे अलीकडच्या काळात जुना मोबाईल विकून नवा स्मार्टफोन घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेक टेकसॅव्ही लोक अगदी दोन-तीन महिन्यांतही आपला मोबाईल विकून नवा स्मार्टफोन खरेदी करतात. (How to sell your old and used mobile phone and tablets online)

मात्र, या विक्री-खरेदीच्या व्यवहारात बऱ्याचदा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकजण आपल्या जुन्या स्मार्टफोनची जास्तीत जास्त किंमत कशी मिळेल, या प्रयत्नात असतात. अशा लोकांसाठी सध्याच्या मायाजलात जुन्या स्मार्टफोनची योग्य किंमत मिळवून देणारी 4 संकेतस्थळे आहेत. या माध्यमातून तुम्हाला जुना मोबाईल फोन जास्तीत जास्त किंमतीला विकता येणे शक्य आहे.

कॅशिफाय

जुने किंवा वापरलेले मोबाईल फोन विकण्यासाठी Cashify हे संकेतस्थळ प्रसिद्ध आहे. आपल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटसची विक्री करून तुम्हाला याठिकाणी चांगला मोबदला मिळू शकतो. या संकेतस्थळावर तुम्हाला टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, आयमॅक आणि गेमिंग कन्सोलही विकता येऊ शकतात.

कर्मा रिसायकलिंग

अलीकडच्या काळात जुन्या स्मार्टफोन्सची विक्री करण्यासाठी आघाडीवर असलेले आणखी एक संकेतस्थळ म्हणजे Karma Recycling. इलेक्ट्रॉनिक गॅझेटस विक्रीचा या संकेतस्थळाचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. अगदी महागड्या किंमतीची गॅझेटस तुम्हाला या संकेतस्थळावरून काही मिनिटांत विकता येऊ शकतात.

यंत्रा

www.yaantra.com हे संकेतस्थळ इलेक्ट्रॉनिक गॅझेटसच्या झटपट विक्रीसाठी ओळखले जाते. विशेष म्हणजे इतर संकेतस्थळांच्या तुलनेत तुम्हाल वापरलेल्या गॅझेटसची चांगली किंमतही मिळते. यंत्रा संकेतस्थळावर अवघ्या एका मिनिटातही तुमच्या जुन्या स्मार्टफोनची विक्री होऊ शकते.

इन्स्टाकॅश

Get Insta Cash हे संकेतस्थळही जुन्या गॅझेटची विक्री करणाऱ्या आघाडीचे व्यासपीठ आहे. तुम्हाला स्मार्टफोन विकायचा असल्यास https://getinstacash.in/ वर लॉगइन करून आपले डिटेल्स टाकावे लागतील. त्यानंतर कंपनीचे कर्मचारी घरी येऊ तुमच्याकडून गॅझेट कलेक्ट करतील. यावेळी नावाप्रमाणे तुमच्या हातावर तातडीने InstaCash पैसे मिळतील.

संबंधित बातम्या:

WhatsApp Stickers द्वारे मित्र-नातेवाईकांना होळीच्या शुभेच्छा द्या, जाणून घ्या स्टिकर्स कुठून मिळवायचे?

8GB/128GB, डुअल सेल्फी कॅमेरासह Motorola चा दमदार स्मार्टफोन लाँच, किंमत…

4GB रॅम, 64GB स्टोरेज, 7,499 रुपयात शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याची शेवटची संधी

(How to sell your old and used mobile phone and tablets online)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI