AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, त्यादिवशी मी तिथे…

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र, अभिनेत्याच्या निधनानंतर कोणत्याही प्रकारची अंत्ययात्रा त्यांची काढण्यात आली नाही किंवा अभिनेत्याचा शेवटचा साधा फोटोही कोणाला बघायला मिळाला नाही.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, त्यादिवशी मी तिथे...
Hema Malini and Dharmendra
| Updated on: Dec 02, 2025 | 9:51 AM
Share

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. धर्मेंद्र मागील काही दिवसांपासून सतत आजारी होते. मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि त्यांच्यावर घरीच उपचार केली जात होती. यादरम्यान अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत असून आता देवावर सर्वकाही सोडल्याचे सांगितले. धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. मात्र, त्यांचे निधन झाल्याचे आणि त्यांच्यावर कुठे अंत्यसंस्कार करणार याबद्दलची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या निधनाबद्दल लपवण्यात आले. हेच नाही तर आपल्या लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा फोटोही कोणाही बघायला मिळाला नाही.

धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने अत्यंत गुप्तता पाळली. त्यानंतर आता जोरदार टीका केली जात आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हमद अल रेयामी यांनी हेमा मालिनी यांची भेट घेतली. हेमा मालिनी यांच्या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत नेमका काय संवाद झाला आणि संपूर्ण स्थिती काय आहे हे त्यांनी सांगितले. हेमा मालिनी यांच्यासोबतचा एक फोटोही त्यांनी शेअर केला.

हमद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, मी हेमा मालिनी यांच्यासोबत संवाद साधत होतो. पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. अश्रू लपवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होते. त्यांनी थोडे थांबून मला म्हटले की, काश त्यांच्यासोबत मी त्यादिवशी फार्महाऊसवर असते… जिथे दोन महिन्यांपूर्वी मी त्यांच्यासोबत होते.. काश मी तिथे त्यांना बघू शकले असते… हे बोलताना हेमा मालिनी यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.

हेमा मालिनी यांनी हमद यांच्यासोबतच्या संवादात फॉर्महाऊसचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, दोन महिन्यांपूर्वी मी तिथे होते. पण काश मी तिथे त्यांना बघू शकले असते. त्यादिवशी मी फॉर्महाऊसवर असायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे हेमा मालिनी यांच्या मनात अखेर कोणती खंत राहिली, यावर चर्चा रंगताना दिसत आहे. असे सांगितले जाते की, धर्मेंद्र हे आपल्या पहिल्या पत्नी प्रकाश काैर यांच्यासोबत जास्त वेळ फॉर्महाऊसवर घालवत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...