AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेमंत ढोमेचं आजवरचं सगळ्यात मोठं स्वप्न; ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ची उत्सुकता, कलाकारांची भक्कम फौज

हेमंत ढोमेचं आजरवरचं सगळ्यात मोठं स्वप्न, सगळ्यात मोठा ध्यास.. 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कलाकारांची भक्कम फौज आहे.

हेमंत ढोमेचं आजवरचं सगळ्यात मोठं स्वप्न; 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम'ची उत्सुकता, कलाकारांची भक्कम फौज
‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 17, 2025 | 10:27 PM
Share

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक हेमंत ढोमेनं त्याच्या आगामी ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या चित्रपटाची घोषणा केली होती. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचं महत्त्व यावर मनोरंजन करत भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचं चित्रीकरण अलिबाग आणि आसपासच्या भागात यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरच यात कलाकार कोण असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. यात कलाकारांचे चेहरे जरी दिसत नसले तरी चित्रपटात दमदार कलाकारांची भक्कम फौज पाहायला मिळणार हे नक्की. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, तरुण पिढीचे स्टार्स अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर, लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोग, कादंबरी कदम, तसेच हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळी प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहे. या सर्व ताकदीच्या कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणं म्हणजे प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

या चित्रपटाविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “माझं शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात झालं आणि आता माझा हा चित्रपट जो मराठी शाळांबद्दलच आहे, त्याचं चित्रीकरण मला याच भागात करता आलं याचा प्रचंड आनंद आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला होता आणि आता चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. माझ्यासोबत असलेले हे सर्व कलाकार आणि माझी संपूर्ण टीम या चित्रपटाची खरी ताकद आहेत. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

आजवरचं सगळ्यात मोठं स्वप्न, सगळ्यात मोठा ध्यास.. असं म्हणत हेमंतने या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यावर नेटकरी आणि सेलिब्रिटी यांच्याकडून दमदार प्रतिसाद मिळाला. बिपीन स्नॅक्सला उभ्या उभ्या साबुदाणा खिचडी खायचास तेव्हा वाटलं नव्हतं एवढा मोठा डायरेक्टर होशील, अशी मजेशीर कमेंट हेमंतचा मित्र आणि अभिनेता अमेय वाघने केली आहे. तर अमृचा खानविलकर, जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे, सुयश टिळक, अभिजीत खांडकेकर, उत्कर्ष शिंदे यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमेनंच केलं आहे. लवकरच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ