AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकट्याने चित्रपट पाहण्यासाठी 10 हजारांचं बक्षीस; थिएटरबाहेर ॲम्ब्युलन्स

ऐशी आणि नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले, ज्यांनी भयपटांना एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलं होतं. या चित्रपटांना पाहून प्रेक्षकांची अक्षरश: घाबरगुंडी उडायची.

एकट्याने चित्रपट पाहण्यासाठी 10 हजारांचं बक्षीस; थिएटरबाहेर ॲम्ब्युलन्स
हॉरर सिनेमाImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2026 | 12:04 PM
Share

हॉरर चित्रपट म्हटलं की अनेकजण सहसा बॉलिवूड चित्रपट बघणं टाळतात. हॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये हॉरर तितक्या दमदार पद्धतीने दाखवलं जात नाही, असं काहींचं मत आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा थिएटरमध्ये बॉलिवूडचे हॉरर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी व्हायची. बॉलिवूड इंडस्ट्रीत काही असे हॉरर चित्रपट बनले आहेत, ज्यांनी प्रेक्षकांची अक्षरश: घाबरगुंडी उडवली आहे. राज, 1920, डरना मना है, कृष्णा कॉटेज यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. असाच एक चित्रपट ऐशी आणि नव्वदच्या दशकात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला पाहून प्रेक्षकांची बोबडीच वळायची आणि त्यावेळी त्याचे अत्यंत भयानक किस्से ऐकायला मिळायचे. असं म्हटलं जातं की जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा बाहेर अॅम्ब्युलन्स उभी राहायची. जेणेकरून प्रेक्षकांना काही आरोग्याची समस्या जाणवली की लगेच मदत मिळावी.

ज्या चित्रपटाबाबत आम्ही इथे बोलतोय, त्याचं नाव ‘बंद दरवाजा’ आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रामसे ब्रदर्सने केलं होतं आणि 1 जून 1990 रोजी तो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘बंद दरवाजा’ हा त्यांच्या सर्वांत भयानक चित्रपटांपैकी एक मानलं जात होतं. मोठ्या पडद्यावर ड्रॅकुलासारख्या राक्षसाला पाहून लोकांच्या अंगावर अक्षरश: काटा यायचा. त्यावेळी या चित्रपटाची एवढी चर्चा होती की रामसे ब्रदर्स हा चित्रपट एकटं पाहणाऱ्यांना 10 हजार रुपयांचं बक्षिस द्यायचे.

या चित्रपटाचं बजेट फक्त 40 लाख रुपये होतं. बॉक्स ऑफिसवर त्याला दमदार प्रतिसाद मिळाला आहे त्या काळी ‘बंद दरवाजा’ने 68 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. तर जगभरातील कमाईचा आकडा 96 कोटींवर पोहोचला होता. या चित्रपटात कुनिका सदानंद, मंजित कुल्लर, अरुणा इरानी, अनिरुद्ध अग्रवाल, अफगाणी अभिनेत्री हशमत खान आणि रजा मुराद यांच्या भूमिका होत्या. रामसे ब्रदर्स यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना जितकं घाबरवलं, तितकीच त्यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईसुद्धा केली. कमी बजेटमध्ये बनलेले हे चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडायचे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...