डेब्यूनंतर इब्राहिमचा भाव वाढला? चाहत्यासोबत गैरवर्तन,चाहते म्हणतायत घमेंडी

इब्राहिम अली खानच्या "नादानियां" चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तो चाहत्यासोबत फारच गर्विष्ठपणे वागताना आणि बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे तो ट्रोलिंगचा बळी ठरत आहे. अनेकांनी त्याच्या अहंकारावर आणि वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे.

डेब्यूनंतर इब्राहिमचा भाव वाढला? चाहत्यासोबत गैरवर्तन,चाहते म्हणतायत घमेंडी
Ibrahim Ali Khan Arrogance? Fans
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2025 | 2:11 PM

सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खानने ‘नादानियां’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर इब्राहिमचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकताच इब्राहिमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. त्याने एका चाहत्याला दाखवलेला चुकीचा गर्वीष्ठपणा. त्यानंतर सगळेच त्याला ट्रोल करत आहे.

इब्राहिमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे

रेडिटवर इब्राहिमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याला विचारताना दिसतोय, ‘तुम्हाला फोटो हवा आहे की नाही?’ असं म्हणून तो सरळ निघून जातो. त्याचे वर्तन पाहून लोक त्याच्याबद्दल विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी त्याला अहंकारी म्हटले आहे तर काहींना वाटते की तो खूपच गंभीर व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे.

इब्राहिमबद्दलची नाराजी वाढली आहे.

व्हिडिओमध्ये, इब्राहिम त्याच्या जिमच्या बाहेर दिसत आहे तेव्हा एक चाहता त्याच्याकडे येतो आणि त्याच्यासोबत हस्तांदोलन करतो. तेव्हा इब्राहिम चाहत्याला विचारताना दिसतो की त्याला फोटो काढायचा आहे का, परंतु तो चाहता काहीतरी पुढे बोलणार तेवढ्यात तो प्रतिसादाची वाट न पाहता थेट आत निघून जातो. त्या चाहत्यासोबत हस्तांदोलन केल्यानंतर तो हात पुसताना दिसत असल्याचंही अनेकांच्या लक्षात आलं. ज्यामुळे लोकांमध्ये त्याच्याबद्दलची नाराजी वाढली आहे.

Ibrahim arrogantly asking people if they want a picture with him 😭💀
byu/Real-Cabinet9952 inBollyBlindsNGossip

या व्हिडीओनंतर लोकांनी सोशल मीडियावर इब्राहिमबद्दल आपले मत शेअर करायला सुरुवात केली. एका वापरकर्त्याने कमेंट केली, ‘तो फक्त एका संकल्पनेतच चांगला होता, तो जोकर बनण्याऐवजी रहस्यमय पतौडी राजकुमारच राहिला पाहिजे.’ तर, दुसऱ्याने लिहिले, ‘त्याने हातही स्वच्छ केले.’ तिसऱ्या व्यक्तीने त्याची निराशा व्यक्त केली, ‘त्याचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मी त्याचा खूप मोठा चाहता होतो. त्याचे व्यक्तिमत्व चांगले आहे असं मला वाटत होतेपण आता असे दिसते की त्याचा लवकरच डाउनफॉल होईल.’ असं म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

7 मार्च 2025 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘नादानियां’ या चित्रपटातून इब्राहिमने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. इब्राहिम आणि खुशी कपूर यांच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. दोन्ही कलाकारांना त्यांच्या अभिनयासाठी टीकेचा सामना मात्र करावा लागला. या चित्रपटाला फ्लॉप म्हणून लेबल लावण्यात आले आहे.