AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imran khan : इम्रान खानवर पायल रोहतगीची बोचरी टीका; म्हणाली, ‘बेरोजगार अभिनेते आंदोलनात जातात’

मुंबई पोलिसांनी अभिनेता इम्रान खान याला 28 ऑक्टोबर पर्यंत देश सोडून जाण्यास सांगितलं आहे. याचदरम्यान अभिनेत्री पायल रोहतगीने अभिनेत्यावर निशाणा साधला आहे.

Imran khan : इम्रान खानवर पायल रोहतगीची बोचरी टीका; म्हणाली, ‘बेरोजगार अभिनेते आंदोलनात जातात’
| Updated on: Oct 16, 2026 | 6:16 PM
Share

बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाच्चा , इम्रान खान (Imran Khan) सध्या बराच चर्चे आहेत. 10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानता झालेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. त्यावेळी इम्रानसोबत त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन आणि बहीणही होती. त्या तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. इम्रान डिटेन झाल्याचे फोटो आणि व्हिडीओज इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले होते, त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. मात्र आता इम्रान खान मोठ्या अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला आता भारत सोडण्याची नोटीस दिली आहे. त्याचं कारण म्हणजे त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व नव्हे तर अमेरिकेची सिटिझनशिप आहे. त्ाला पाठवण्यात आलेल्या नोटिशीवरून विविध चर्चा झाल्या असून मोठी खळबळ माजली आहे.

काय म्हणाली पायल रोहतगी ?

याच दरम्यान, आता अभिनेत्री पायल रोहतगीने इम्रान खानवर जोरदार टीका केली आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर असलेल्या पायलने इम्रानला ‘बेरोजगार अभिनेता’ असं संबोधलं आहे. नुकत्याच IANS शी झालेल्या संभाषणात पायल रोहतगीने टीकास्त्र सोडलं. ती म्हणाली, ” अशा मूर्खपणाच्या गोष्टी करू नयेत हे त्यांना हे समजायला हवं होतं. तो भारतीय नागरिक नाही, तर अमेरिकन नागरिक आहे. सर्वप्रथम, तुम्ही अमेरिकन नागरिक आहात आणि भारतात राहून इथे काम करत आहात. तुम्ही लग्नही केलं आहे. पण मला वाटतं की तुम्ही व्हिसा घेतला नव्हता किंवा काय, हे मला माहीत नाही. त्याचा घटस्फोट झाला आहे की आणखी काही, हेही मला माहीत नाही.” असं तिने नमूद केलं.

याच विषयावर पुढे बोलताना ती म्हणाली, “मग तुम्ही विरोध प्रदर्शनाच्या ठिकाणी का जाता ? अनेक बेरोजगार अभिनेते अशा आंदोलनांमध्ये सहभागी होतात, जेणेकरून त्यांना प्रसिद्धी मिळेल. कारण तिथे सर्वजण उपस्थित असतात, नाही का? आंदोलनाचे वार्तांकन करणं आवश्यक असते, त्यामुळे अनेक बेरोजगार अभिनेते अशा ठिकाणी जातात” अशा शब्दांत तिने निशाणा साधला.

गर्लफ्रेंडने शेअर केली पोस्ट

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी मुंबई, दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली होती. अभिनेता इम्रान खान याला देश सोडण्यास सांगण्यात आलेलं असतानाच, आता चित्रपट निर्तीत्या आणि आमिर खान याची पूर्व पत्नी किरण रावनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले, “वा! म्हणजे आता मुंबई पोलीस?”

मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देणारी किरण राव काही एकटी नव्हती, अभिनेत्री सबा आझादने या कारवाईला ‘बकवास’ म्हटलं. इम्रान खान याला मिळालेल्या नोटीशीबाबत पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, “ काय? हे तर अगदीच बकवास आहे.” किरण राव आणि सबा आझाद या दोघींनंतर, इम्रानची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन हिनेही एक फोटो पोस्ट केला. या फोटोत इम्रान आणि लेखा दोघेही डिटेन्शन व्हॅनमध्ये बसलेले दिसत आहेत. या फोटोसोबत तिने अनेक हार्ट इमोजी शेअर केल्या.

इम्रान खानला का पाठवण्यात आली नोटीस ?

मिळालेल्या माहितीनुसार, परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने (FRRO) इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश दिले. या नोटिशीला आव्हान देण्यासाठी इम्रानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यायचा निर्णय घेतला. ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनांमध्ये कथितरीत्या बेकायदेशीरपणे सहभागी झाल्यामुळे इम्रानला भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला होता. इम्रान खान हा भारतीय नागरिक नसून त्याच्याकडे भारताचे ओव्हरसीज सिटिझनशिप (OCI) कार्ड आहे, असे FRRO ने आपल्या आदेशात म्हटलं. तरीही आंदोलनांमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्याने कथितरीत्या परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केले आहे, असं त्यात नमूद करण्यात आलं.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?