Rekha: ना पती, ना जोडीदार मग 72 वर्षांच्या रेखा कुणाच्या नावाचा लावतात सिंदूर? भांगात का लावतात कुंकू? अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Bollywood Actress Rekha: ना पती ना जोडीदार तरी 72 वर्षांच्या रेखा कुणाच्या नावाचा लावतात सिंदूर? भांगात का लावतात कुंकू? अभिनेत्रीने आता याविषयीचा मोठा खुलासा केला आहे. त्यांनी लोकांच्या मनातील शंकाकूशंकांना उत्तर दिले आहे.

Bollywood Actress Rekha: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा त्यांचे सौंदर्य आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. त्यांचे आयुष्य अजूनही रहस्यमय आहे. विविध कार्यक्रमात सिंदूर असलेली त्यांची गोड छबी आजही अनेकांच्या काळजात घर करते. ना पती ना जोडीदार तरी 72 वर्षांच्या रेखा कुणाच्या नावाचा लावतात सिंदूर? भांगात का लावतात कुंकू? अभिनेत्रीने आता याविषयीचा मोठा खुलासा केला आहे. त्यांनी लोकांच्या मनातील शंकाकूशंकांना उत्तर दिले आहे.
राष्ट्रपतींनीच थेट केली होती विचारणा
रेखा यांच्या आयुष्याविषयी अनेक रंजक किस्से आहेत. त्याचा उल्लेख यासिर उस्मान यांच्या रेखा: द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात आहे. एका राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील हा किस्सा आहे. वर्ष 1981 मध्ये उमराव जान या चित्रपटात त्यांनी दमदार अभिनय केला होता. या भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावेळी देशाचे राष्ट्रपती हे नीलम संजीव रेड्डी हे होते. जेव्हा रेखा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर पोहचल्या, तेव्हा राष्ट्रपती रेड्डी यांनी सर्वांच्या मनातील तो प्रश्न त्यांना विचारला.
रेखा यांनी काय दिले उत्तर?
त्यांच्या भांगेतील कुंकू पाहून त्यांनी विचारले की, तुम्ही सिंदूर का लावता? त्यावेळी रेखा यांनी कोणताही आडपडदा न ठेवता सहज उत्तर दिले. मी ज्या शहरातून येते, तिथे सिंदूर लावणे ही सामान्य बाब आहे. ही एक फॅशन असल्याचे उत्तर दिले. रेखा यांच्या या उत्तराने त्यावेळी सर्वांची उत्सुकता चाळवली गेली होती. त्यांच्या सिंदूर लावण्यामागे अनेक दंतकथा समोर आल्या होत्या. त्यांचं नाव काही आघाडीच्या अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. पण अभिनेत्रीने त्यांच्या खासगी आयुष्याविषयी कधीही समोर येत माहिती दिली नाही.
या चित्रपटाने दिली खास ओळख
रेखा यांचा चित्रपट प्रवास अत्यंत जोरदार राहिला. त्यांनी अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका जिवंत केल्या. त्यांच्या कसदार अभिनयाने त्याकाळी अनेकांना भुरळ घातली. सौंदर्यासह त्यांच्या सहज अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘नागिन’ (1976), ‘मुकद्दर का सिकंदर’ (1978), ‘मिस्टर नटवरलाल’ (1979), ‘खूबसूरत’ (1980), ‘उमराव जान’ (1981) आणि ‘खून भरी मांग’ (1988) सारख्या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची छाप सोडली. पण त्यांनी स्वतःला कधीच स्टार मानले नाही. आपण अभिनेत्री असल्याचा उल्लेख त्या सातत्याने करत आल्या. 1996 मधील खिलाडियो का खिलाडी चित्रपटातील त्यांची नकारात्मक भूमिका असो वा कोई मिल गया, कृष या सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या.