‘बेवकूफ औरत!’ आमिर खान मला मनातल्या मनात असं म्हणाला असेल; अलिशा चिनॉयने गमावली होती मोठी संधी
गायनाशिवाय मी एक चांगली अभिनेत्रीही बनू शकले असते. ही कहाणी आमिर खानला माहीत आहे. मी त्याच्यासोबत काम करू शकले असते पण... गायिकेने केला मोठा खुलासा

जर्नी, प्रेरणा आणि अेक पिढ्यांवर टाकणाऱ्या संगीतामागच्या न सांगितलेल्य कहाण्यांबद्दल माहिती दिली. याच सीरिजच्या लेटेस्ट भागात विख्यात गायिका आलिशा चिनॉय सहभागी झाली होती. भारताची ‘इंडिपॉप क्वीन’ आपल्या दमदार आवाजाने, लोकप्रिय गाण्यांनी आणि खास व्यक्तिमत्त्वाने संगीतविश्वात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या पार्श्वगायिकांपैकी एक म्हणून मोठे यश मिळवले. मात्र, त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना केवळ गायिकाच नव्हे, तर अभिनेत्री होण्याचीही इच्छा होती.
तिने भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या पार्श्वगायिकांपैकी एक म्हणून मोठे यश मिळवलं. मात्र, तिच्या सुरुवातीच्या काळात तिला केवळ गायिकाच नव्हे, तर अभिनेत्री होण्याचीही इच्छा होती.
काय म्हणाली अलिशा चिनॉय ?
या पॉडकास्टमध्ये आपल्या जुन्या इच्छेबद्दल बोलताना अलिशाने ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनचा किस्सा सांगितला. ती म्हणाली,” गायनाव्यतिरिक्त मला अभिनेत्रीही व्हायचं होतं. ही गोष्ट आमिरला माहीत आहे. ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटासाठी मी ऑडिशनही दिली होती. माझ्यासोबत डायलॉग्सची तालीमही करण्यात आली. मात्र, घरी गेल्यावर मला जाणवलं की मला क्यूवर रडताच येत नाहीये.” असं ती म्हणाली.
अलीशाने पुढे सांगितलं, बॉलिवूडमधील अभिनयाची पारंपरिक शैली तिला फारशी आवडली नाही. ‘ चित्रपटातील अभनियाचा हा जो संपूर्ण प्रकार आहे ना, तो मला खूप कृत्रिम वाटला. त्यात काही वास्तवता, खरेपणा जाणवत नव्हता. म्हणून एक अभिनेत्री म्हणून मी त्यात कधी कम्फर्टेबल राहू शकणार नाही, असं मला वाटलं. शेवटी मी स्वतःच स्वतःला सांगितलं की, ‘ तू फक्त एक चांगली गायिका आहेस. अभिनयाचा विचार सोडून दे.’ आणि त्यामुळे मी फायन ऑडिशनसाठी गेलेच नाही,” असं अलिशाने नमूद केलं.
अखेर दिसली ही अभिनेत्री
विशेष म्हणजे, त्या अंतिम ऑडिशनसाठी केवळ दोन अभिनेत्रींचा विचार केला जात होता—अलिशा चिनॉय आण दुसरी म्हणजे, जुही चावला. मात्र, अलिशा त्या फायनल ऑडिशनला ने गेल्याने आमिर खान तिच्यावर नाराज झाला होता. अभिनयाची ती संधी गमावणे ही त्यांची “खूप मोठी चूक” होती, असं मला पुढे जाणवलं. आमिर खानसोबतच्या नंतरच्या भेटीची आठवण सांगताना अलीशा मिश्कीलपणे म्हणाली, ‘त्यानंतर मी आमिरला फक्त एकदाच भेटले. आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. निदान तो तरी हसला. मला वाटत होतं की तो माझ्याकडे पाहून मनात म्हणाल असेल, ‘मूर्ख बाई!’’- असं तिने नमूद केलं.
