त्या गाण्यामुळे चित्रपट झाला हिट, शाहरुख नगमाचं ते गाणं 33 वर्षांनंतरही सुपरहिट, 2026मध्ये मिळाले 83 लाख व्ह्यूज

90च्या दशकातील गाण्यांची जादू आजही कायम असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. 1993 मध्ये आलेल्या ‘किंग अंकल’ चित्रपटातील ‘इस जहाँ की नहीं है’ हे गाणं तब्बल 33 वर्षांनंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आलं आहे.

त्या गाण्यामुळे चित्रपट झाला हिट, शाहरुख नगमाचं ते गाणं 33 वर्षांनंतरही सुपरहिट, 2026मध्ये मिळाले 83 लाख व्ह्यूज
Srk Nagma romantic song
Image Credit source: social media
| Updated on: Sep 22, 2026 | 8:56 PM

बॉलिवूड सिनेमांची क्रेझ आजही चाहत्यांना कायम असते. कधी चुकून एखादं जुनं गाणं प्ले झालं तर त्याला मनापासून पाहिलं जातं. 90 च्या दशकातलं संगीत म्हणजे संगीतप्रेमींसाठी कायमच एक खास पर्वणी असते. काळ कितीही पुढे गेला, तरी त्या काळातल्या धुनांची जादू आजही रसिकांच्या मनावर राज्य करते. असंच 1993 साली आलेलं एक सदाबहार रोमँटिक गाणं तब्बल 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खान आणि नगमा यांच्यावर चित्रित झालेल्या या सुंदर गाण्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा वेड लावलंय. जवळपास 1 वर्षापूर्वी हे गाणं यूट्यूबवर पुन्हा रिलीज करण्यात आलं आणि पाहता पाहता आतापर्यंत याला 83 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, शिवाय 22 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलंय.

किंग अंकल गाण्यातलं सुपरहिट गाणं

हे गाणं आहे 1993 च्या ‘किंग अंकल’ या चित्रपटातलं सुपरहिट ट्रॅक ‘इस जहाँ की नहीं है’. लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांचा सुमधुर आवाज, राजेश रोशन यांचं उत्कृष्ट संगीत आणि इंदीवर यांनी लिहिलेले हृदयस्पर्शी बोल आजही लोकांच्या हृदयाला भिडत आहेत. इतक्या वर्षांनंतरही या गाण्याची भुरळ लोकांवरून अजिबात उतरलेली नाही.

 

 

चाहत्यांच्या विविध प्रतिक्रियांनी वेधलं लक्ष

यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांचं हेच अफाट प्रेम अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतंय. गाण्याच्या लोकप्रियतेबद्दल बोलताना एका युझरने लिहिलंय, “या गाण्यात असं काय आहे की इतक्या वर्षांनंतरही लोक ते तितक्याच प्रेमाने ऐकतात?”. तर, गाण्याच्या बोलांचं कौतुक करताना दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलंय, “”दो जहां दे के लेलूं तो सस्ती है ये… वा काय लाईन आहे”. या गाण्याचं महत्त्व सांगताना एका प्रेक्षकाला तर थेट असं वाटतं की, “या एकाच गाण्याने हा चित्रपट हिट केला”. याशिवाय आणखी एका चाहत्याने आपलं प्रेम व्यक्त करत लिहिलंय, “वा काय गाणं आहे, कितीही वेळा ऐकलं तरी कमीच आहे “. या सर्व कमेंट्सवरून हेच सिद्ध होतं की, खऱ्या भावनांनी ओतप्रोत भरलेली आणि चांगल्या चालीची गाणी कधीच जुनी होत नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us