AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या; ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट, चाहते नाराज

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत मोठा ट्विस्ट पहायला मिळतोय. अभिनेत्री ईशा केसकरने या मालिकेला रामराम केल्याचं कळतंय. नक्षत्रा मेढेकरची या मालिकेत एण्ट्री झाली आहे. ईशाच्या एक्झिटवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या; 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट, चाहते नाराज
Lakshmichya PavalaniImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 23, 2025 | 2:58 PM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या लोकप्रिय मालिकेबद्दल गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा होती, ती अखेर खरी ठरली आहे. या मालिकेत कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर आता यापुढे मालिकेत दिसणार नाही. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत्या. त्यानंतर मालिकेचा नवीन प्रोमो पाहून या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. आता ईशाच्या एक्झिटवर शिक्कामोर्तब झाला आहे. या मालिकेत ईशाची जागा अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर घेणार आहे. या मालिकेत ईशा गेल्या दोन वर्षांपासून कलाची भूमिका साकारत होती. आता नव्या गोष्टीसह मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. हे नवं पात्र नक्षत्रा मेढेकर साकारणार आहे.

या मालिकेत कलाला त्यांच्या घराचं सत्य अद्वैतला सांगायचं असतं. त्यासाठी ती चिठ्ठी लिहिते आणि अद्वैतपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. मात्र रस्त्यातच तिचा अपघात होतो. त्यावेळी मालिकेत सुकन्याची एण्ट्री होते. सुकन्या कलाला रुग्णालयात घेऊन जाते. कलाच्या अपघाताबद्दल अद्वैतला समजताच तो रुग्णालयात धाव घेतो. कला अद्वैतला अंगाई गायला सांगते आणि तेव्हाच ती अखेरचा श्वास घेते. तर दुसरीकडे सुकन्याला हृदयविकार असतो आणि तिला कलाचं हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं. कलाच्या मृत्यूच्या सहा महिन्यानंतर सुकन्या आणि अद्वैतची भेट होते आणि तिथून मालिकेत नवीन वळण येतं.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेतील सुकन्या पाटील ही व्यवसायाने नर्स आणि अनेक गुपितं मनात साठवून शांत आयुष्य जगणारी मुलगी आहे. रुग्णांची सेवा करायला तिला आवडतं म्हणूनच तिने हे क्षेत्र निवडलंय. या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं निमित्त होता येतं याचा तिला आनंद आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर सुकन्या पाटील ही भूमिका साकारणार असून जवळपास चार वर्षांनंतर ती मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.

ईशा केसकरने तिच्या एक्झिटबद्दल अद्याप कोणती प्रतिक्रिया दिली नसली तरी चाहत्यांनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही आता ही मालिका पाहणार नाही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘कलाची भूमिका बदलण्याची गरजच नव्हती, आता मालिका आणखी रटाळ होणार’, असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘मालिकेत अद्वैत आणि कला असतील तरच आम्ही बघू’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...