AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा विकला की काय? कमेंटवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली ‘तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे…’

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने गणेशोत्सवादरम्यान सोशल मीडियावर तिच्या डान्सचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यावरील कमेंट्स वाचून तिने राग व्यक्त केला आहे. नवरा विकला की काय, अशा प्रकारचे कमेंट्स तिच्या रीलवर आले आहेत.

नवरा विकला की काय? कमेंटवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली 'तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे...'
जान्हवी किल्लेकरImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 20, 2026 | 10:02 AM
Share

‘बिग बॉस मराठी 5’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे. गणेशोत्सवानिमित्त शेअर केलेल्या एका रीलवरून झालेल्या ट्रोलिंगला जान्हवीने आता थेट उत्तर दिलं आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून ट्रोल करणाऱ्यांना तिने चांगलंच सुनावलं असून, नकारात्मक कमेंट्सचा सामना करण्यासाठी आपल्या पोस्टचं कमेंट सेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने जान्हवीने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. एका पोस्टमध्ये ती साडी, टिकली आणि मंगळसूत्र अशा पारंपरिक लूकमध्ये दिसली होती. देवासमोर हात जोडतानाचा तिचा फोटोही तिने शेअर केला होता. मात्र, या पोस्टवरही काही नेटकऱ्यांनी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत विचित्र कमेंट्स केल्या. यातील एका कमेंटमध्ये थेट ‘नवरा विकला का काय?’ असा सवाल करण्यात आला होता.

यानंतर जान्हवीने तिच्या जाऊबाईसोबत ‘सण गौरी गणपतीचा आला’ या गाण्यावर एक रील शेअर केली. या रीलमध्ये दोघीही उत्साहात नाचताना दिसत आहेत. मात्र, या व्हिडीओवरही काही युजर्सनी आक्षेप घेतला. गणपती बाप्पाकडे पाठ करून नाचत असल्याचं म्हणत काहींनी तिला ट्रोल केलं. त्यामुळे या सगळ्या टीकेला जान्हवीने स्वतः व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं.

जान्हवीचा व्हिडीओ-

जान्हवीने तिच्या व्हिडीओमध्ये ट्रोलर्सना उद्देशून म्हटलं की, तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये काही ना काही चूक शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या दिवशी साधा पारंपरिक लूक केला, देवासमोर हात जोडले तरी कमेंट्स करण्यात आल्या आणि दुसऱ्या दिवशी नाचल्यावरही टीका झाली. त्यामुळे टीका करायचीच असेल तर किमान त्यामागे काहीतरी तर्क असावा, असा टोला तिने लगावला. गणेशोत्सव, दहीहंडी किंवा नवरात्रीसारख्या सार्वजनिक सणांमध्ये अनेकजण देवासमोर नृत्य करतात, मग तिच्या रीलवरच आक्षेप का घेतला जातो, असा सवालही जान्हवीने उपस्थित केला. या ट्रोलिंगचा आपल्याला फारसा फरक पडत नसल्याचं सांगत ती आपलं आयुष्य आनंदाने जगत असल्याचं म्हणाली. तिच्या चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमावर लक्ष केंद्रित करायचं असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना जान्हवीने कमेंट सेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचंही सांगितलं. पुन्हा नकारात्मक कमेंट्स येण्याची शक्यता असल्याने आपण कमेंट्स बंद करत असल्याचं तिने कॅप्शनमधून स्पष्ट केलं. त्यामुळे जान्हवीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी