AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: तो फोन आला अन् अश्रूंचा बांध फुटला, नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकताच जयवंत वाडकरांना धक्काच बसला

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता या बातमीनंतर त्यांचे मित्र मराठी अभिनेते जयवंत वाडकर प्रचंड भावूक झाले आहे, त्यांच्या बातमीने त्यांना धक्का बसला असून ते काय म्हणाले ते पाहा...

Nana Patekar: तो फोन आला अन् अश्रूंचा बांध फुटला, नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकताच जयवंत वाडकरांना धक्काच बसला
| Updated on: Oct 08, 2026 | 7:59 AM
Share

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांच्यावर उपचार केले परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. आता या बातमीनंतर त्यांचे मित्र मराठी अभिनेते जयवंत वाडकर प्रचंड भावूक झाले आहे, त्यांच्या बातमीने त्यांना धक्का बसला असून ते काय म्हणाले ते पाहा…

जयवंत वाडकर म्हणाले की, ” मला कळलं आताच खरं तर शब्द सुचत नाहीये, खरंच काय बोलू मी, एवढं काम त्याच्याबरोबर केले आहे, आमची सुरुवात त्याच्यासोबत झाली आहे, सतिश पुळेकर आमचे गुरु, आमच्या सगळ्या वन एक्च प्लेला गायडन्स करणं, म्हणजे आता खूप खूप आठवणी आठवतं आहे,  त्याच्यासोबत शेवटचे काम केले होते ते नटसम्राटमध्ये, त्या चित्रपटातील आठवणी तर आहेतच. मला कळत नाही देवाला इतके उत्साही माणूस कसे काय आवडतात?, मला काही कळलेच नाही म्हणजे सकाळी जो फोन आला ना उडालो मी, मग मी कन्फर्म केलं एकदा, पण ही खूपच धक्कादायक आणि वाईट गोष्ट आहे, मी आता काय बोलू कळतं नाही, मला सूचतच नाहीये, सॉरी पण खूप वाईट बातमी आहे ही.

नाना पाटेकर यांनी आपली फिटनेस दाखवली. फोटोग्राफर आणि निर्माते अतुल कासबेकर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेला एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दिवंगत अभिनेते सलग १५ ट्रायसेप डिप्स करताना दिसत आहेत. ते हे डिप्स न थांबता करत होते आणि शेवटी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. यामुळे या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Follow Us
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?