AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेह वडील सैफला पापाराझींपासून बॉडीगार्डप्रमाणे वाचवत होता, व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले ‘हा तर करीनाचा प्रो मॅक्स व्हर्जन’

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह अली खानचा एक गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेह आपल्या वडील सैफला पापाराझींपासून बॉडीगार्डप्रमाणे वाचवताना दिसत आहे. त्याच्या या कृतीमुळे नेटकऱ्यांना करीना कपूरची आठवण झाली असून, अनेक जण त्याला 'बेबो 2.0' म्हणत आहेत.

जेह वडील सैफला पापाराझींपासून बॉडीगार्डप्रमाणे वाचवत होता, व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले 'हा तर करीनाचा प्रो मॅक्स व्हर्जन'
Jeh was protecting his father Saif from the paparazzi like a bodyguard, video goes viralImage Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 24, 2025 | 1:28 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान , करीना कपूर हे सेलिब्रेटी आहेत त्याचपद्धतीने त्यांचे दोन्ही मुलं देखील कायम चर्चेत असतात. ते देखील सेलिब्रेटी किड्सच आहेत. या दोघांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताही सोशल मीडियावर करीनाचा धाकटा मुलगा जेहचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अलीकडेच बांद्रा इथे खरेदी करण्यासाठी सैफ अली खान गेला होता तेव्हा त्याचा धाकटा मुलगा जेहचा एक गोड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जेह वडील सैफची अशी घेत होता काळजी 

जेह चक्क वडील सैफ अली खानच्या सुरक्षेची अगदी बॉडीगार्डसारखी काळजी घेताना दिसला. सैफ अली खान प्रत्यक्षात त्याची मुले जेह आणि तैमूरसह खरेदीसाठी बाहेर होता, त्यादरम्यान त्याचा धाकटा मुलगा त्याच्या अंगरक्षकाच्या शैलीत पापाराझींना त्याच्या वडिलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसला. जेहची त्याच्या वडिलांची काळजी घेतानाचा तो गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता ही क्लिप इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

पापाराझींना थांबवण्याचा प्रयत्न केला

व्हिडिओमध्ये जहांगीर अली खान दूरवरून धावत येताना दिसतो आणि दोन्ही हात पुढे करून पापाराझींना थांबवण्याचा प्रयत्न करतो. सैफ अली खानच्या सहाय्यकाने त्याला उचलून गाडीत बसवल्यानंतरही, तो गाडीत बसल्यानंतरही त्याच्या वडिलांचे फोटो न काढण्याचा इशारा करताना दिसत आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचे कुटुंब त्याच्याबद्दल अत्यंत चिंतेत असतं. सैफच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायम अलर्ट राहताना दिसतात.

व्हिडीओवर कमेट्सचा भडीमार

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली की, “छोटे बाबा त्यांच्या मोठ्यांना फोटो काढण्यापूर्वी परवानगी घेण्यास शिकवत आहेत.” दुसऱ्याने लिहिले, “ही गोंडसता रोखणे कठीण आहे.” एका फॉलोअरने व्हायरल व्हिडिओवर कमेंट केली की, “हे बाळ करीना कपूर खानचे प्रो मॅक्स व्हर्जन आहे.” तर एकाने लिहिले, “हे बाळ नाहीये, हे बेबो 2.0 वर्जन आहे.” या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...