AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता एक्स गर्लफ्रेंडकडे परत जाताच पत्नीच्या संयमाचा बांध तुटला; म्हणाली ‘थुंकून चाटणाऱ्याला..’

पवन सिंह आणि अक्षरा सिंह ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एकेकाळची लोकप्रिय जोडी होती. मात्र, त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. आता पवनने माफी मागितल्यामुळे त्यांच्या नात्यातील जुना अध्याय पुन्हा चर्चेत आला आहे.

अभिनेता एक्स गर्लफ्रेंडकडे परत जाताच पत्नीच्या संयमाचा बांध तुटला; म्हणाली 'थुंकून चाटणाऱ्याला..'
ज्योती सिंह, अक्षरा आणि पवन सिंहImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2026 | 9:24 AM
Share

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि गायक पवन सिंह, अभिनेत्री अक्षरा सिंह आणि त्यांची पत्नी ज्योती सिंह यांच्या वैयक्तिक आयुष्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी पवन सिंहने एका सार्वजनिक कार्यक्रमात अक्षरा सिंहची माफी मागितली होती. यावेळी त्याने अक्षराला ‘बाबू’ आणि ‘बेटा’ असं संबोधलं. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. आता ज्योती सिंहने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे. दुसऱ्या लग्नाबाबतच्या चर्चांदरम्यान ज्योतीने व्यक्त केलेल्या भावना चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

पवन सिंहने अक्षरा सिंहची मागितली माफी

बिहारमधील मुंगेर इथं दुर्गापूजा महोत्सवादरम्यान पवन सिंह एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने अक्षरा सिंह आणि तिच्या कुटुंबीयांचा उल्लेख करत जुन्या गोष्टींबद्दल माफी मागितली. “अक्षरा माझा बाबू आहे, माझा बेटा आहे,” असं म्हणत त्याने तिच्याबद्दल आपुलकी व्यक्त केली. अक्षराच्या आई-वडिलांना आपल्यामुळे वाईट वाटलं असेल, तर त्यांचीही मनापासून माफी मागतो, असं पवनने सांगितलं. इतकंच नव्हे, तर पवनने प्रेक्षकांना आपण आणि अक्षरा पुन्हा एकत्र काम करताना पाहायला आवडेल का, असाही प्रश्न विचारला. त्याच्या या वक्तव्यामुळे दोघांची जोडी पुन्हा पडद्यावर दिसणार का, याबाबत चर्चा सुरू झाली.

पहा व्हिडीओ-

पवनच्या या वक्तव्यानंतर त्याची पत्नी ज्योती सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तिने कोणाचंही नाव न घेता, “वाह रे राजपूताना स्वाभिमान,” असं लिहिलं. या पोस्टसोबत तिने हसण्याचे इमोजीही शेअर केले. तिची ही पोस्ट पवन सिंहच्या वक्तव्याला उद्देशून असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. ज्योतीने आणखी काही पोस्ट आणि स्टोरीज शेअर करत आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या. शांत राहिलं तर आरोप होतात आणि बोललं तर प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ काढला जातो, अशा आशयाची पोस्टही तिने शेअर केली. या पोस्टमधून तिला झालेल्या त्रासाची आणि अपमानाची भावना व्यक्त होत असल्याचं दिसून आलं.

ज्योतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत सिंदूर लावताना दिसत आहे. ज्योतीने तिच्या मैत्रिणी आणि बहिणीसोबत मिळून पवनवर निशाणा साधला आहे. ज्योतीच्या मैत्रिणीने तिच्या मैत्रिणीची भांग सिंदूरने लवकरच लाल व्हावी, यासाठी देवीकडे प्रार्थना केली. हे ऐकून ज्योती म्हणाली, “नाही माता.. चांगला पती भेटला तरच भांग सिंदूरने लाल करा. नाहीतर मी अशीच ठीक आहे. नवरा श्रीमंत नसला तरी चालेल, पण तो चांगल्या स्वभावाचा, प्रामाणिक आणि दहा ठिकाणी तोंड मारणारा नसावा.” तेव्हाच ज्योतीची मैत्रीण म्हणते, “थुंकून चाटणारा नसावा.” हे ऐकून ज्योतीसुद्धा जोरजोरात हसू लागते. ज्योतीच्या या व्हिडीओवर अद्याप पवन सिंहने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

पवन सिंह आणि ज्योती सिंह यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद यापूर्वीही चर्चेत आले आहेत. दोघांच्या घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचं वृत्त आहे. ज्योतीने यापूर्वीही हे नातं पुन्हा सावरण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे पवनने अक्षराची जाहीरपणे माफी मागितल्यानंतर ज्योतीच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष गेलं आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ