Dakhkhancha Raja Jyotiba | इशारा देऊनही मालिकेचे चित्रीकरण सुरूच! संतप्त ज्योतिबा ग्रामस्थ पुन्हा आक्रमक

‘दख्खनचा राजा...’ मालिका बंद करावी, तसेच भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या महेश कोठारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनासोबत झालेल्या बैठकी दरम्यान केली आहे.

Dakhkhancha Raja Jyotiba | इशारा देऊनही मालिकेचे चित्रीकरण सुरूच! संतप्त ज्योतिबा ग्रामस्थ पुन्हा आक्रमक
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 2:04 PM

कोल्हापूर : चुकीचा इतिहास दाखवला जात असलेली स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ (Dakhkhancha Raja Jyotiba serial) या मालिकेचे चित्रीकरण थांबवावे, या मागणीसाठी ज्योतिबा ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मालिकेच्या कथानकावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा पुजारी, प्रशासकीय प्रतिनिधी तसेच पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. ‘दख्खनचा राजा…’ मालिका बंद करावी, तसेच भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या महेश कोठारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनासोबत झालेल्या बैठकी दरम्यान केली आहे (Jyotiba Villager’s Angry On Kothare Vision’s Dakhkhancha Raja Jyotiba serial).

या बैठकी दरम्यान पुजाऱ्यांनी अभ्यासकांच्या या कथानकावर आक्षेप व्यक्त केला. इतिहास सुधारून चित्रीकरण करण्याला परवानगी द्या, अन्यथा स्वतःहून चित्रीकरण बंद पाडू, असा इशारा यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. याशिवाय, चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांची चर्चा करूनच त्यांचे प्रसारण करू, असे आश्वासन महेश कोठारे यांनी दिले होटे. मात्र, तसे न करता परस्पर चुकीचा इतिहास प्रसारित केल्याबद्दलही ग्रामस्थांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीनंतर आता प्रशासन ‘कोठारे व्हिजन’च्या या मालिकेसंदर्भात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लागले आहे.

वादाचे नेमके कारण…

अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ (Dakhkhancha Raja Jyotiba) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. पौराणिक मालिकेच्या या कथानकावर ज्योतिबा ग्रामस्थांनी आक्षेप (objection) घेतला आहे. या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या चित्रीकरणावर बंदी आणा अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा ज्योतिबा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत दिला होता.

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तसेच ‘कोठारे प्रॉडक्शन’चे सर्वेसर्वा महेश कोठारे यांनी दिशाभूल केल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला होता. तर, या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ग्रामपंचायतीकडून परवानगीही घेतली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. शिवाय मालिकेचे कथानक जर, केदार विजय ग्रंथानुसार बदलले गेले, तरच चित्रीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ज्योतिबा ग्रामस्थांनी केली होती (Jyotiba Villager’s Angry On Kothare Vision’s Dakhkhancha Raja Jyotiba serial).

या आधीही बंदीची मागणी

या आधीही स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या कथानकावर जोतिबा ग्रामस्थांनी आक्षेप घेत कथानकात बदल करण्यास सांगितले होते. या मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले होते. कथानकात योग्य ते बदल करूनच मालिका सुरू करा, असे आवाहन ग्रामस्थांकडून ‘कोठारे व्हिजन’ला करण्यात आले होते. योग्य इतिहास दाखवला जात नाही, तोपर्यंत मालिका बंद ठेवण्यासाठीचे निवेदन ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीला सादर करण्यात आले होते.

(Jyotiba Villager’s Angry On Kothare Vision’s Dakhkhancha Raja Jyotiba serial)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.