Dakhkhancha Raja Jyotiba | ‘दख्खनचा राजा…’  मालिकेचे चित्रीकरण बंद करा, ज्योतिबा ग्रामस्थांचा उद्रेक!

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

Dakhkhancha Raja Jyotiba | ‘दख्खनचा राजा...’  मालिकेचे चित्रीकरण बंद करा, ज्योतिबा ग्रामस्थांचा उद्रेक!
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 10:42 AM

मुंबई : अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ (Dakhkhancha Raja Jyotiba) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. पौराणिक मालिकेच्या या कथानकावर आता ज्योतिबा ग्रामस्थांनी आक्षेप (objection) घेतला आहे. या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या चित्रीकरणावर बंदी आणा अन्यथा उद्रेक होईल, वाडीरत्नागिरी (ज्यो’तिबा) ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे असा इशारा दिला आहे. (Angry Jyotiba Villegers stop shooting of Dakhkhancha Raja Jyotiba)

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ‘कोठारे प्रॉडक्शन’चे सर्वेसर्वा महेश कोठारे यांनी दिशाभूल केल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ग्रामपंचायतीकडून परवानगीही घेतली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शिवाय मालिकेचे कथानक जर, केदार विजय ग्रंथानुसार बदलले गेले, तरच चित्रीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ज्योतिबा ग्रामस्थांनी केली आहे.

या आधीही बंदीची मागणी

या आधीही स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या कथानकावर जोतिबा ग्रामस्थांनी आक्षेप घेत कथानकात बदल करण्यास सांगितले होते. या मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले होते. कथानकात योग्य ते बदल करूनच मालिका सुरू करा, असे आवाहन ग्रामस्थांकडून ‘कोठारे व्हिजन’ला करण्यात आले होते. योग्य इतिहास दाखवला जात नाही, तोपर्यंत मालिका बंद ठेवण्यासाठीचे निवेदन ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीला सादर करण्यात आले होते. (Angry Jyotiba Villegers stop shooting of Dakhkhancha Raja Jyotiba)

महाराष्ट्राचं लोकदैवत ‘ज्योतिबा’

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ म्हणजे महाराष्ट्राचं लोकदैवत. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त आपल्या लाडक्या दैवताला साकडं घालतात. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. ‘कोठारे व्हिजन’च्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे आपल्या लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस पूर्ण झाली आहे. या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होत आहे.(Jyotiba Villager’s objection on ‘Dakhkhancha Raja Jyotiba’ story)

विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग सुरू आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे.

(Angry Jyotiba Villegers stop shooting of Dakhkhancha Raja Jyotiba)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.