AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त प्रसिद्धीसाठी नाही, कलावंत ढोल-ताशा पथकातील कलाकार घेतात इतकी मेहनत, कधी झाली सुरुवात?

विद्याधर जोशी यांच्या एका वक्तव्यानंतर 'कलावंत ढोल-ताशा पथक' सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. अभिनेत्री श्रुती मराठेनं विद्याधर जोशींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. हे पथक कधीपासून सुरू झालं, त्यात कोणकोणते कलाकार आहे, ते जाणून घेऊयात..

फक्त प्रसिद्धीसाठी नाही, कलावंत ढोल-ताशा पथकातील कलाकार घेतात इतकी मेहनत, कधी झाली सुरुवात?
श्रुती मराठे, सौरभ गोखले, तेजस्विनी पंडितImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2026 | 8:19 AM
Share

गणेशोत्सव आणि ढोल-ताशा हे समीकरण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग मानलं जातं. पुण्याच्या गणेशोत्सवात तर ढोल-ताशांच्या गजराला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या ‘कलावंत ढोल-ताशा पथका’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी या पथकातील कलाकारांच्या वादनाबाबत सोशल मीडियावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर अभिनेत्री श्रुती मराठे यांनी दिलेल्या उत्तरामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला.

काय आहे कलावंत ढोल-ताशा पथक?

मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना एकत्र आणून तयार करण्यात आलेलं हे विशेष ढोल-ताशा पथक आहे. या पथकाच्या स्थापनेबाबत उपलब्ध माहितीनुसार, कलाकारांनी 2013-14च्या काळात एकत्र येऊन पथकाची सुरुवात केली. ढोल-ताशा वाजवण्याची आवड आणि गणेशोत्सवाविषयीची आस्था यामुळे कलाकारांनी ही परंपरा स्वतः अनुभवण्याचा निर्णय घेतला. या पथकात अभिनेता सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, श्रुती मराठे, तेजस्विनी पंडित, अनुजा साठे, संस्कृती बालगुडे यांच्यासह मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या वर्षांमध्ये या पथकातील कलाकारांची संख्या आणि सहभाग बदलत राहतो.

पहा व्हिडीओ-

कलाकारांना ढोल-ताशा वाजवण्याची गरज का वाटते?

कलाकारांसाठी हे केवळ सोशल मीडिया व्हिडिओ किंवा प्रसिद्धीचा भाग नसून गणेशोत्सवाशी जोडलेला अनुभव असल्याचं त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांमधून दिसून येतं. सौरभ गोखलेनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कलाकार म्हणून काम करताना मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या वलयापेक्षा पथकात सर्वजण समान असतात आणि बाप्पाच ‘सुपरस्टार’ असतो.

पथकाचा सराव किती असतो?

विद्याधर जोशी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रुती मराठेनं सांगितलं की, कलाकार सुमारे दीड महिना सराव करतात, गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांत अनेक वेळा वादन करतात आणि विसर्जनाच्या दिवशी जवळपास साडेसात तासांच्या मिरवणुकीत सहभागी होतात. कलाकारांना वादनाची मनापासून आवड असल्यामुळे ते हा अनुभव घेतात, असं श्रुतीने म्हटलंय.

पहा व्हिडीओ-

कलावंत पथक प्रसिद्ध का झालं?

ढोल-ताशांचा पारंपरिक उत्साह आणि लोकप्रिय मराठी कलाकारांचा सहभाग यामुळे या पथकाला सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळाली. गणेशोत्सवाच्या काळात कलाकारांचे वादनाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. विशेष म्हणजे हे पथक केवळ वादनापुरतं मर्यादित नसून सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी होतं. अलीकडे पथकाने सह्याद्री परिसरात बचावकार्य करणाऱ्या काही रेस्क्यू टीम्सचा सन्मान करत त्यांना आर्थिक मदतही केली.

म्हणूनच ‘कलावंत ढोल-ताशा पथक’ हे महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीला मनोरंजनसृष्टीतील कलाकारांच्या सहभागाची जोड देणारं एक वेगळं उदाहरण ठरतं. यंदाच्या गणेशोत्सवात विद्याधर जोशी आणि श्रुती मराठे यांच्या सोशल मीडिया संवादामुळे या पथकाच्या मेहनतीची आणि वादनामागच्या सरावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?