दीपिकाला तिचा हट्टच नडला; 1000 कोटींच्या चित्रपटातून एक्झिट, प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली जागा

'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्या भागा मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आता या सीक्वेलमध्ये झळकणार नाही. तिची जागा एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने घेतल्याचं कळतंय.

दीपिकाला तिचा हट्टच नडला; 1000 कोटींच्या चित्रपटातून एक्झिट, प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली जागा
Deepika Padukone
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 04, 2026 | 10:16 AM

नाग अश्विनच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या सीक्वेलविषयी पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. या चित्रपटाच्या निर्माती वैजयंती आणि दिग्दर्शक जरी याविषयी मौन बाळगून असले तरी सोशल मीडियावर याच्याशी संबंधित अनेक अपडेट्स समोर येत आहेत. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोणची एक्झिट झाली आहे. आता सीक्वेलमध्ये दीपिकाची जागा एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने घेतली आहे. ही अभिनेत्री तिच्या ‘नो-मेकअप लूक’मुळे अनेकदा चर्चेत आली आहे. इतकंच नव्हे तर करिअरच्या सुरुवातीला तिचा चेहरा अक्षरश: मुरुमांनी भरलेला होता. तरीही तिने नैसर्गिक सौंदर्याला प्राधान्य देत मेकअप करणं टाळलं होतं.

‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वेलमध्ये दीपिकाची जागा घेणारी ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून साई पल्लवी आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर 2025 मध्ये दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणने ‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वेललाही सोडलं. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने जवळपास 20 दिवसांपर्यंत या चित्रपटासाठी शूटिंग केलं होतं, परंतु नंतर तिने अचानक तिची फी वाढवण्याची मागणी केली होती. यावरून झालेल्या मतभेदांनंतर तिने अखेर प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला.

आता चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाची जागा साई पल्लवीने घेतली आहे. यासंदर्भात अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा साई पल्लवीच्या टीमने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु साईच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कल्कीच्या सीक्वेलमधील भूमिकेसाठी साई पल्लवीच योग्य असल्याचं निर्मात्यांचं मत आहे.

हा संपूर्ण वाद तेव्हा सुरू झाला होता, जेव्हा दीपिकाने 8 तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी केली होती. त्यानंतर तिला संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’लाही सोडावं लागलं होतं. तेव्हाच ‘कल्की 2898 एडी’चा सीक्वेलसुद्धा तिच्या हातून गेला. निर्मात्यांनी खुद्द एक पोस्ट शेअर करत दीपिकाची चित्रपटातून एक्झिट झाल्याचं स्पष्ट केलं होतं.

‘कल्की 2898 एडी’च्या अखेरीस SUM-80 ची कथा?

SUM-80, जिचं खरं नाव सुमती आहे, की प्रोजेक्ट K च्या एका प्रयोगशाळेत ठेवलेली गर्भवती महिला असते. ती कल्कीच्या भविष्यवाणीतील आई आहे. तेलुगू व्हर्जनमध्ये दीपिकाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोभिता धुलिपालाने डबिंग केली होती. जेव्हा SUM-80 ही सुप्रीम यास्किनच्या (कमल हासन) लॅबमधून पळून जाते, तेव्हा तिची देखभाल अश्वत्थामा (अमिताभ बच्चन) करतात. या चित्रपटाच्या शेवटती भैरव (प्रभास) गर्भवती SUM-80 ला तिथून घेऊन पळून जातो. याचदरम्यान अश्वत्थामाला जाणवतं की भैरव हा त्यांचा मित्र कर्णाचा पुनर्जन्म आहे. जून 2024 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि जगभरात या चित्रपटाने तब्बल 1042 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.