‘एक थी शेरनी …. और एक भेड़ियों का झुंड’; संजय राऊतांच्या ट्विटवर कंगनाचा रिप्लाय

अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलीवूड इंडस्ट्रीविरोधात आरोपांची राळ उडवली होती. | Kangna Ranaut

'एक थी शेरनी .... और एक भेड़ियों का झुंड'; संजय राऊतांच्या ट्विटवर कंगनाचा रिप्लाय
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 11:27 PM

मुंबई: प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा चवताळून उठली आहे. तिने ट्विट करून जावेद अख्तर आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनीच ट्विट करून जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती दिली होती. कंगनाने राऊतांचे हे ट्विट टॅग करत रिप्लाय आहे. ‘एक थी शेरनी ….. और एक भेड़ियों का झुंड’, असे कॅप्शन लिहीत तिने आपल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Kangna Ranaut attack on Sanjay Raut and Javed Akhtar)

अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर कंगनाने मुंबई पोलीस, शिवसेना आणि  बॉलीवूड इंडस्ट्रीविरोधात आरोपांची राळ उडवली होती. यामध्ये तिने अनेक बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींना लक्ष्य केले होते. काही दिवसांपूर्वीच कंगनाने धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच न्यायालयाकडूनही मुंबई पोलिसांना कंगनाच्या चौकशीची मुभा देण्यात आली आहे. यानंतर आता जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल केल्याने तिच्या अडचणीत भर पडली आहे. जावेद अख्तर यांनी अभिनेता ऋतिक रोशन याच्याविरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप कंगना रनौतने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. त्यामुळे या आरोपांविरोधात जावेद यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केल्याचे समजते.

काय म्हणाली होती कंगना रानौत?

काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.

संबंधित बातम्या:

चौकशी होणारच! कंगना रनौतसह बहिण रंगोली चंदेलला वांद्रे पोलिसांची नोटीस

‘मंद बुद्धी, बहु गर्वी’, मेट्रो कारशेडच्या जागेवरुन अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

(Kangna Ranaut attack on Sanjay Raut and Javed Akhtar)

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.