कंगना रनौत विरोधात जावेद अख्तर यांचा अब्रू नुकसानीचा दावा, मुलाखतींमधून बदनामी केल्याचा आरोप

जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात अंधेरी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे (Javed Akhtar files defamation case against Kangana Ranaut).

कंगना रनौत विरोधात जावेद अख्तर यांचा अब्रू नुकसानीचा दावा, मुलाखतींमधून बदनामी केल्याचा आरोप

मुंबई : प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. कंगनाने विविध मुलाखतीत आपली बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. त्यांनी कंगना विरोधात अंधेरी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे (Javed Akhtar files defamation case against Kangana Ranaut).

जावेद अख्तर यांनी अभिनेता ऋतिक रोशन याच्याविरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप कंगना रनौतने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. त्यामुळे या आरोपांविरोधात जावेद यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे (Javed Akhtar files defamation case against Kangana Ranaut)..

काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.

कंगनाने अनेकवेळा जावेद यांच्यावर अशाप्रकारची टीका केली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने देखील जावेद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले आहेत. अखेर याविरोधात जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचललं आहे.

जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

संबंधित बातमी : Pulwama Attack: जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर कंगणांचं टीकास्त्र

Published On - 8:24 pm, Tue, 3 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI