'सूर्यवंशी'च्या निर्मात्यांच्या यादीतून करण जोहरचं नाव हटवलं?

सोशल मीडियावर करण जोहरवर वाढती टीका पाहता त्याचं नाव 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या निर्मात्यांच्या यादीतून हटवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे (Karan Johar is part of film Sooryavanshi).

'सूर्यवंशी'च्या निर्मात्यांच्या यादीतून करण जोहरचं नाव हटवलं?

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर चित्रपट निर्माता करण जोहरवर प्रचंड टीका होत आहे (Karan Johar is part of film Sooryavanshi). करण जोहर फक्त स्टार किड्सला काम देत असल्याचा आरोप सुशांतच्या चाहत्यांकडून करण्यात आला आहे. सोशल मीडियावर करण जोहरवर वाढती टीका पाहता त्याचं नाव ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निर्मात्यांच्या यादीतून हटवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे (Karan Johar is part of film Sooryavanshi).

दरम्यान, चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “सुर्यवंशी चित्रपटातून करण जोहरचं नाव हटवल्याची बातमी खोटी आहे. याबाबत रिलायन्स एंटरटेनमेंटने स्पष्टीकरण दिलं आहे”, असा खुलासा तरण आदर्श यांनी केला आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना संकटामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. देशभरात सध्या सर्व थिएटर बंद आहेत. दिवाळीपर्यंत सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यास हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होऊ शकतो.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं आहे. तर अभिनेता अक्षयकुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षयच्या भूमिकेचे नाव सूर्यवंशी आहे.

या चित्रपटात अभिनेता अजय देवगण आणि रणवीस सिंहदेखील दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रेक्षकांना ‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ एकाच फ्रेममध्ये दिसणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *