AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चमकदार अन् सुंदर त्वचेसाठी करीना कपूर स्वयंपाकघरातील या वस्तूंपासून बनवते फेसपॅक; स्वत:च केला खुलासा

करीना कपूर खान तिच्या अभिनयासोबतच या वयातही तिच्या सौंदर्यासाठीही तेवढीच चर्चेत असते. बेबो 44 वर्षांची आहे आणि या वयातही तिची त्वचा सुंदर, मुलायम आणि टवटवीत दिसते. त्याचं रहस्य एक फेस मास्क आहे जो ती घरी बनवते. स्वयंपाकघरातील 4 वस्तूंचा वापर करून ती हा फेस मास्क बनवते. ज्याची तिच्या त्वचेसाठी, पिग्मेंटेशन सुधारण्यासाठी मदत होते. याबद्दल ती अनेकदा मुलाखतींमध्येही बोलली आहे. तो मास्क कोणता आणि कशापासून ती बनवते हे जाणून घेऊयात.

चमकदार अन् सुंदर त्वचेसाठी करीना कपूर स्वयंपाकघरातील या वस्तूंपासून बनवते फेसपॅक; स्वत:च केला खुलासा
Kareena Kapoor Secret Face PackImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2025 | 8:17 PM
Share

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान ही अशी एक आयकॉन आहे जिच्या सौंदर्याने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. करीना कायमच तिच्या अभिनयासोबतच तिचे सौंदर्य, तिच्या मोहक अदा आणि तिची एक खास बेबो स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्या स्टाइल आणि लूकच्या चाहते नेहमीच प्रेमात पडतात. सध्या करीना 44 वर्षांची आहे तरीही ती फीट आणि सुंदरच आहे. पण या वयातही तिला हे सर्व हाताळणे कसे काय शक्य होते हे जाणून घेण्याची चाहत्यांची नक्कीच इच्छा असते.

करीना कपूर वापरते हा घरगुती फेस मास्क 

तर करीना कपूर तिच्या इतर ब्युटी ट्रिक्ससोबतच घरगुती उपायही करते. होय, त्वचा मुलायम, सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी करीना स्वयंपाकघरातच उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून फेसपॅक बनवते आणि तोच फेस मास्क ती लावत असते. याबद्दल तिने अनेकदा मुलाखतींमध्येही सांगितले आहे. या फेस मास्कमुळे तिच्या चेहऱ्यावर जादुई चमक येते असंही तिने म्हटलं होतं. तो फेस मास्क म्हणजे बदाम तेल, मध आणि दही. करीनाच्या या फेसमास्कमध्ये असं काय खास आहे जे तिच्या त्वचेला तरूण आणि सुंदर ठेवते चला जाणून घेऊयात.

बदाम तेल

अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात असलेले व्हिटॅमिन ई केवळ निरोगी त्वचेला प्रोत्साहन देत नाही तर तिचे सौंदर्य देखील वाढवते. करीनाच्या मते, ती बदाम तेलाने तिच्या चेहऱ्यावर मालिश करते, ज्यामुळे तिची त्वचा चमकण्यास मदत होते. बदाम तेल लावल्याने त्वचा मऊ आणि कोमल होते.

मध

करीना वापरते तो आणखी एक घटक म्हणजे मध. जर तुमची त्वचा नेहमीच कोरडी असेल तर तुम्ही करीनाप्रमाणे मधाने तुमच्या त्वचेची मालिश करू शकता. ते फेस पॅकमध्ये मिसळल्याने डाग कमी होण्यास आणि तुमची त्वचा मऊ होण्यास मदत होते.

दही आणि बदाम तेलाचा फेस मास्क

करीना कपूर खान निरोगी त्वचा राखण्यासाठी अनेकदा फेस मास्क बनवते. हा फेस मास्क स्वयंपाकघरातील या तीन घटकांना एकत्र करून बनवला जातो. दही बदाम तेल अन् थोडसं मध. हा मास्क पिग्मेंटेशन सुधारण्यास मदत करतो.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.